Home Remedy For Uric Acid in Marathi : कोलेस्ट्रॉल आणि युरिक अॅसिडची समस्या आजकाल लोकांसमोर मोठं आव्हान आहे. वाढत युरिक अॅसिडमुळे सांधेदुखी, सांधे आणि गुघडेदुखीची समस्या गंभीर झाली आहे. या समस्येपासून आराम मिळावा म्हणून अनेक औषधं आणि तेल बाजारात उपलब्ध आहे. पण आज आम्ही तुम्हाला घरगुती आणि आयुर्वैदिक उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे शरीरातील यूरिक ॲसिड फिल्टर होऊन बाहेर पडले आणि या गंभीर आजारापासून तुम्हाला आराम मिळेल. आम्ही आयुर्वैद तज्ज्ञांशी संपर्क साधला त्यांनी घरगुती पाच ड्रिंक्स सांगितले आहेत ज्यांच्या सेवनामुळे तुम्हाला फायदा होईल.


'हे' 5 ड्रिंक्स रक्त आणि सांध्यामधील Uric Acid काढेल बाहेर


सफरचंद व्हिनेगर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऍपल सायडर व्हिनेगर युरिक ऍसिडच्या रुग्णांसाठी टॉनिकचं काम करतं. तुम्ही याचा उपयोग सहज करु शकता. जर तुम्ही युरिक ॲसिडच्या समस्येने त्रस्त असाल तर रोज एक ग्लास पाण्यात एक कप व्हिनेगर मिसळून प्या. यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळेल. 


लिंबाचा रस


अतिरिक्त यूरिक ॲसिड काढून टाकण्यासाठी तुम्ही दिवसातून दोनदा लिंबू पाण्याच सेवन करावे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड असते जे यूरिक ऍसिड विरघळण्यास मदत होते. याशिवाय तुम्ही आवळा, पेरू आणि संत्री यांसारखे व्हिटॅमिन सी असलेले पदार्थचं सेवन करा. 


काकडीचा रस


काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी आणि यूरिक ऍसिडसह विषारी पदार्थ काढून टाकण्यास फायदेशीर ठरेल. हे ड्रिंक तयार करण्यासाठी ताजी काकडी पाण्यात मिसळून बारीक करा आणि याच सेवन दररोज करा. 


चेरी रस


चेरीमध्ये अनेक घटक असतात जे सूज कमी करण्यास आणि यूरिक ऍसिडची पातळी कमी करण्यास फायदेशीर असतं. ते रोज प्यायल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो, असं आहार तज्ज्ञ सांगतात.


आले चहा 


आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अदरकमध्ये असे अनेक दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे यूरिक ऍसिडची पातळी कमी करून सांधेदुखीपासून आराम मिळतो. यासाठी आल्याचे तुकडे 5 ते 10 मिनिटे गरम पाण्यात उकळा आणि नंतर चवीनुसार मध किंवा लिंबू घालून दिवसातून 2-3 वेळा याच सेवन करावं. 


(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)