मुंबई : आजकाल तणावग्रस्त जीवनशैली आणि धावपळीचे युग हे  प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग झाला आहे. वेळीअवेळी जेवल्याने तसेच चमचमीत पदार्थ खाल्ल्याने अनेकांना अपचनाचा त्रास होतो. अशावेळी बाजारात मिळणारी अ‍ॅन्टासिडस घेण्याऐवजी सहज सोपा घरगुती करणे अधिक परिणामकारक ठरतो. तुळस-आलं व मध यांचा एकत्रित मिश्रण शरीरावर दुष्परिणाम न होता मळमळणे, उलट्या होणे अशा त्रासापासून सुटका होण्यास मदत करते.


तुळस, आलं आणि मधाचे मिश्रण 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संस्कृतीमध्ये ‘तुळस’ ही फारच पवित्र मानली जाते. त्यामुळे धार्मिक कार्यासोबतच आयुर्वेदातही तुळशीचा प्रामुख्याने वापर केला जातो. आहारतज्ञ डॉ. स्वाती दवे यांच्यामते, तुळस, आलं आणि मधाचे मिश्रण पित्तामुळे होणारी मळमळ कमी करते. आल्यामुळे तोंडात लाळ निर्मितीची प्रक्रिया वाढते. यामुळे पचनक्रियेला गती मिळते. तुळस पचन सुधारणारी एन्झाईम्सची निर्मिती करते तर मधामुळे पचनमार्गाच्या स्तराला आराम मिळतो.


कसे बनवाल हे मिश्रण  


स्वच्छ धुतलेली 5-6 तुळशीची पानं आणि मध्यम आकाराचा आल्याचा तुकडा खलबत्यात ठेचून जाडसर पेस्ट करा.


या पेस्टमध्ये मध मिसळून त्याचे चाटण तयार करा. पण या चाचण्यांनी मध शुद्ध आहे की भेसळयुक्त हेदेखील पारखून घ्या.


हे मिश्रण मळमळणे, उलट्या होणे अशा लक्षणांवर फारच गुणकारी ठरते.


गरोदर स्त्रियांमध्ये गर्भारपणात सकाळी उठल्यावर मळमळण्याची समस्या सर्रास आढळते. मात्र अनशेपोटी घेतल्यास फारच गुणकारी ठरते.


लहान मुलांना देखील हे चाटण देणे अत्यंत हितकारी आहे.


परंतू हे चाटण ताजे बनवावे. तुम्ही हे बनवून ठेवू नये.


टीप – हा केवळ घरगुती उपाय आहे. त्यामुळे औषधांच्या बदल्यात घेऊ नये. त्रास दीर्घकाळ टिकल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.