मुंबई : केसगळतीचा त्रास दुर्लक्षित केल्यास टक्कल पडण्याचा धोका असतो. आजकाल ताणतणाव, संतुलित आहाराचा अभाव, प्रदुषण यामुळे केसगळीचा त्रास सर्रास आढळतो. म्हणूनच तुमचे केस अधिक प्रमाणात गळत असल्यास काही घरगुती मास्कच्या मदतीने हा केसगळतीचा त्रास आटोक्यत ठेवण्यास मदत होते.  केसगळतीच्या समस्येमागे तुमच्या या '7' चूका कारणीभूत


केसगळती रोखणारे हेअर पॅक्स 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओट्स आणि दूध 


चमचाभर ताज्या दूधामध्ये एक चमचा ओटमील मिसळा. या मिश्रणाची पेस्ट करून केसांवर त्याचा मास्क लावा. 20 मिनिटांनी शाम्पूने केस स्वच्छ धुवावेत. या मास्कमुळे केसगळतीचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते.  


अंड आणि ग्रीन टी 


अंड्यातील पिवळा भाग आणि ग्रीन टी एकत्र करून पेस्ट बनवा. या पेस्टचा हेअर मास्क सुमारे 30 मिनिटं केसांवर लावा. या हेअर मास्कचा आठवड्यातून 3 दिवस  वापर करा. 


कांदा आणि तुरटी 


केसगळती रोखण्यासाठी कांदा फायदेशीर आहे. 2 कांदे आणि तुरटीचा तुकडा एकत्र करा. केस स्वच्छ धुतल्यानंतर हा मास्क डोक्यावर लावा. वासाचा त्रास होत असल्यास डोक्याला टॉवेल गुंडाळा. आठवड्यातून दोन दिवस हा उपाय केल्याने केसगळतीचा त्रास कमी होईल. 


मध, रम आणि अंड


अंड्यामुळे केस घनदाट आणि चमकदार होण्यास मदत होते. एक चमचा मध, रम, एरंडेल तेल आणि अंड्यातील पिवळा भाग एकत्र करा. यामध्ये तुम्ही व्हिटॅमिन ए आणि ईच्या कॅप्सुल मिसळू शकता. या मास्कला टाळूपासून लावा. त्यानंतर गरम पाण्यात बुडवलेल्या टॉवेलमध्ये केसांना गुंडाळा. तासभर केस गुंडाळून ठेवल्यानंतर केसांना शाम्पूने स्वच्छ धुवावेत. 


केळं आणि अंड 


केळ्यामध्ये अंड्याचा पिवळा भाग मिसळा. तयार हेअर मास्क केसांना लावून 30-40 मिनिटं सुकवा. कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवावेत. या मास्कच्या नियमित वापरामुळे केसगळतीचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते.