Dhruv Agarwala weight loss: फिटनेस, वेलनेस आणि वजन कमी करण्याच्या बाबतीत एका भारतीय व्यावसायिकाने नवे उदाहरण जगासमोर ठेवले आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट (SCMP) च्या अलीकडील अहवालानुसार, एक रियल इस्टेट सर्च प्लॅटफॉर्म housing,com चे सीईओ ध्रुव अग्रवाल यांनी केवळ डाएट आणि फिटनेसमुळे त्यांचे जवळजवळ अर्धे वजन कमी केले आहे. वजन कमी करण्याच्या या प्रवासात त्यांनी केवळ आरोग्यदायी सवयी स्वीकारल्या आणि कोणत्याही औषधाचा वापर केला नाही. ध्रुव अग्रवालच्या यांच्या रिअल वेटलॉस प्रवासातून अनेक तरुणपिढी किंवा इतर लोकांनी काय शिकावे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑक्टोबर 2021 मध्ये भारताच्या एका बिझनेस ट्रिपदरम्यान त्यांची प्रकृती खालावली. त्यांनी साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट (SCMP) ला सांगितले की, माझे हृदय खूप वेगाने धडधडत होते, मला चिंता वाटत होती. मला वाटलं मी मरेन. त्यांनी पुढे सांगितले की, मी विचार करत होतो की एक दिवस माझे वजन कमी होईल, एक दिवस मी फिट होईन, पण एके दिवशी मी हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये पोहोचलो. मला तो क्षण स्पष्टपणे आठवतो जेव्हा हॉस्पिटलच्या बेडवर पडून मी माझ्या आरोग्याची आणि वजन कमी करण्याची जबाबदारी घेण्याचा संकल्प केला.


एससीएमपीच्या अहवालानुसार, ध्रुव अग्रवाल यांचे वजन काही महिन्यांपूर्वी 151.7 किलो होते. महत्त्वाचे म्हणजे ते प्री-डायबेटिक होते एवढंच नव्हे तर त्यांनी स्लीप एपनिया होता आणि उच्च कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाबावर औषधोपचार करत होते. नोव्हेंबर 2021 पर्यंत ते सर्व औषधांपासून मुक्त होते. त्यांनी सांगितले की, माझे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब पातळी आता सामान्य आहे, मी स्लीप एपनिया मशीनपासून मुक्त झालो असून आता मीला प्री-डायबेटिक नाही.


दोन वर्षांत 71 किलो वजन कसे कमी केले?


ध्रुव अग्रवाल यांनी सिंगापूरमधील पर्सनल ट्रेनरसोबत आठवड्यातून तीन वेळा स्ट्रेंथ-ट्रेनिंग सेशन्स केले. महत्त्वाचे म्हणजे दररोज 10,000 पावले 12,000 पर्यंत वाढवली. त्यांच्या ट्रेनर अहमद झाकीने सांगितले की, त्ंयानी ध्रुव अग्रवाल यांना टेनिस दिग्गज रॉजर फेडररचा अनुभव सांगून प्रेरणा दिली. झाकीने एससीएमपीला सांगितले की, मी त्यांना विश्वास दिला की, जर तो फेडररचे वजन 80 किलोपर्यंत कमी करु शकला तर हे तुम्हाला का शक्य नाही.  दैनंदिन कॅलरीजचे प्रमाण 1,700 कॅलरीजपर्यंत कमी केले. एवढंच नव्हे त्यांनी अल्कोहोल, प्रक्रिया केलेले आणि तळलेले पदार्थ पूर्णपणे आहारातून काढून टाकले आणि प्रत्येक जेवणात प्रथिने पोटात जातात की नाही त्याची काळजी घेतली.