मुंबई : कोरोना व्हायरसच्या महामारीमध्ये जगात आणखी एक मोठ्या संसर्गाने डोकं वर काढलं आहे. मंकीपॉक्स असं या संसर्गाचं नाव आहे. जगातील अनेक देशांमध्ये या संसर्गाचे रुग्ण समोर आले आहेत. युरोपातील देशांमध्ये या संसर्गाने थैमान घातलं आहे. हा मंकीपॉक्स संसर्ग किती धोकादायक आहे याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ ईश्वर गिलाडा यांनी सांगितलं की, मंकीपॉक्सच्या संसर्गाला घाबरण्याची गरज नाही. कारण हा एचआयव्ही सारखा zoonotic आहे. हा विषाणू माकडापासून येतो, ज्याला सिमियन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस म्हणतात. असे विषाणू प्राण्यांमध्ये पसरतात पण माणसापर्यंत पोहोचतात. हा खूप शक्तिशाली अँटी-व्हायरल नसून व्हायरल बदलत राहतात.


महामारीचं रूप धारण करणार नाही


 ईश्वर गिलाडा पुढे म्हणाले की, हा विषाणू महामारीचे रूप धारण करेल यात काहीही तथ्य नाही. कोविड सारखं, ज्याने एका छोट्या शहरातून सुरुवात केली आणि जगातील अनेक देशांमध्ये महामारीला जन्म दिला. कोरोनाने 2 वर्षे जग ठप्प केलं होतं, पण घाबरण्याची गरज नाही, फक्त अभ्यासाची गरज आहे.


मंकीपॉक्स संसर्गाची प्रकरणं आतापर्यंत युरोपियन देशांमध्ये आढळून आली आहेत. आतापर्यंत 10 हून अधिक देशांमध्ये मंकीपॉक्सचे 100 हून अधिक रुग्ण आढळले आहेत.


मंकीपॉक्सची लक्षणं


  • स्नायूंमध्ये वेदना आणि थंडी वाजूणं

  • रुग्णाला खूप थकवा जाणवणं 

  • लिम्फ नोड्स सुजणं

  • तीव्र ताप आणि न्यूमोनियाची लक्षणं

  • शरीरावर गडद लाल ठिपके दिसणं

  • डोकेदुखी