मुंबई : वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आपण विविध पद्धतींचा वापर करतो. यामध्ये अनेकजण ज्यूस डाएटचा पर्याय निवडतात. काही लोकांचा असा समज आहे की, ज्यूस डाएट घेतल्याने वजन आणि चरबी कमी होण्यास मदत होते. मात्र हे योग्य आहे का? वजन कमी करण्यासाठी ज्यूस डाएट घेणं योग्य ठरणार का. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वजन कमी करण्यासाठी हेल्दी खाण्याची गरज आहे. ज्युसेस हेल्दी स्नॅक्सचा उत्तम पर्याय आहे. परंतु, वजन कमी करण्यासाठी इतर अन्नपदार्थांऐवजी ज्युस पिणं योग्य नाही. त्वचा चांगली राहण्यासाठी आणि वजन कमी होण्यासाठी अनेकजण भाज्या, फळांचा ज्यूस पितात. डिटॉक्सिफिकेशनसाठी ज्यूस डाएट फायदेशीर ठरतं. परंतु, वजन कमी करण्यासाठी ज्यूस डाएट घेणे योग्य नाही. 


ज्यूस डाएट घेणं का टाळावं?


कमी प्रोटीन


ज्युस डाएट मधून तुमच्या शरीराला गरजेचे असणारे प्रोटीन्स कमी प्रमाणात मिळतात. मसल बिल्डिंग आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी प्रोटीन्सची मदत होते.


पोषक घटक मिळत नाही


फळे, भाज्यांमधून तुम्हाला फायबर, प्रोटीन तसंत मिनरल्स सारखे शरीराला गरजेचे असणारे घटक मिळतात. परंतु, फक्त ज्युस डाएटमुळे तुम्हाला हे पोषक घटक मिळत नाहीत.