मुंबई : पावसाळ्याच्या दिवसात अनेक आजार पसरण्याची शक्यता असते. या आजारांपासून दूर राहण्यासाठी औषधगोळ्यांपेक्षा घरगुती उपाय अनेकदा फायदेशीर ठरतात. वातावरणामध्ये बदल झाल्यास सर्दी,ताप, खोकला, व्हायरल इंफेक्शन, बद्धकोष्ठते पचनाचे त्रास अधिक बळावतात. अशा सुरूवातीला लहान सहान वाटणार्‍या परंतू भविष्यात गंभीर ठरू शकतील अशा या समस्यांना दूर ठेवण्यासाठी आजीबाईच्या बटव्यातील म्हणजेच स्वयंपाक घरातील अनेक पदार्थ फायदेशीर ठरतात. 


हिरडा ठरतो फायदेशीर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयुर्वेदामध्ये हरड प्रामुख्याने वापरला जातो. त्याला 'हरितकी' असेही म्हणतात. आरोग्यासोबतच सौंदर्य खुलवण्यासाठीदेखील हरड फायदेशीर ठरते. पावसामुळे पसरणार्‍या इंफेक्शनला टाळण्यासाठी हरड मदत करते.  


अ‍ॅलर्जी दूर ठेवते - 


हिरड्याचा काढा त्वचेशी निगडीत अ‍ॅलर्जी दूर ठेवण्यास मदत करते. हिरडा पाण्यात उकळून त्याचा काढा दिवसातून दोन वेळेस घेतल्यास अ‍ॅलर्जी कमी होण्यास मदत होते. 


फंगल इंफेक्शनवर परिणामकारक 


पावसाळ्याच्या दिवसात दूषित पाण्यातून चालल्यामुळे किंवा त्याच्या संपर्कात आल्याने फंगल इंफेक्शनचा धोका बळावतो. फंगल इन्फेक्शनवर हिरडा आणि हळदीचा लेप प्रभावशाली ठरतो. दिवसातून दोनदा हा लेप लावल्यास फायदा होतो.  


उलटी, सूज असा त्रास कमी करण्यास फायदेशीर  


हिरडा आणि मध याचे एकत्र सेवन केल्यास उलटीचा त्रास कमी होतो. तोंडामध्ये सूज जाणवत असल्यास हिरड्याच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. तोंड आल्यास त्यावर हिरड्याचा लेप लावा. यामुळे हिरड्यांचे आरोग्यही सुधारते.  


बद्धकोष्ठतेपासून आराम 


हिरड्यामधील गॅलिक अ‍ॅसिड शरीरात कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. सोबतच रक्तातील प्लाज्मा इन्सुलिन वाढवण्यास मदत करते. पावसाळ्यात कमजोर झालेल्या पचनशक्तीमुळे बद्धकोष्ठता किंवा पचनाचा त्रास बळावल्यास हिरडा त्यावर उपयुक्त आहे. हिरड्याचा पल्प आणि चिमुटभर मीठ एकत्र खावे. यासोबतच तुम्ही लवंग आणि दालचिनीचादेखील समावेश करू शकता.  


वजन घटवणं 


हिरड्यामध्ये अनेक आजारांचा सामना करण्याची क्षमता आहे. पचनसंस्थेला चालना देण्यासाठी हिरडा मदत करते. शरीराला डिटॉक्स करण्याची क्षमता आहे.