PCOS : पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम (PCOS- Polycystic ovary syndrome ) एक असा त्रास, ज्यानं आज अनेक महिला त्रस्त आहेत. या एका व्याधीमुळं त्यांना अनेक त्रासांचा सामना करावा लागत आहे. शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पद्धतींच्या अडचणींवर उचपार करण्यासाठी याच महिला मग असंख्य उचपार पद्धतींचा अवलंब करताना दिसत आहेत. पण, सतराशे साठ उपचार करण्यापेक्षा आयुर्वेद तुम्हाला यातून सावरण्यासाठी अगदी सहजपणे मदत करतं. खुद्द सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हिनंसुद्धा याचीच मदत घेतली आहे. (how masaba gupta delt with pcos with the help of ayurveda and some good habits) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मुलाखतीदरम्यान तिनं आपल्याला असणारा त्रास आणि त्यातून सावरण्यासाठी झालेली आयुर्वेदाची मदत यावर वक्तव्य केलं. आपला अनुभव सर्वांसमोर मांडला. 


काय आहे पीसीओएस (what is pcos)? 
पीसीओएस ही एक अशी अवस्था आहे, जिथं स्त्रीच्या अंडाशयात एण्ड्रोजन अधिक प्रमाणात उत्पादित होतं. हे हार्मोंस पुरुषांशी संबंधित असून, ते महिलांमध्ये आढळतात. त्यांचं प्रमाण मात्र कमी असतं. प्रत्येकाच्या शारीरिक क्षमतेनुसार याचे परिणाम आणि लक्षणं दिसून येतात. त्याच धर्तीवर उपचारही घेतले जातात. मसाबाही त्यातलीच एक होती. पण, तिला मोठी मदत केली ती मात्र आयुर्वेद आणि काही चांगल्या सवयींनी. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by HealthShots (@hthealthshots)


(Food and fitness) आहार आणि शारीरिक सुदृढता 
मसाबाच्या अनुभवानुसार शरीराला तुम्ही काय देता आणि किती हालचाल करता याचं प्रमाण तुम्हाला या त्रासापासून दूर ठेवू शकतं. यांना कोणताही पर्याय उपलब्ध नाही असंही तिनं सांगितलं. सोबतच मन शांत ठेवणं, सतत चिडचीड न करणं, नकारात्मक विचार न करणं हे काही मुद्देही तिनं अधोरेखित केले.


यावर अमुक एक असा उपाय नाही... 
ही एक हार्मोनल समस्या असून, प्रजनन काळादरम्यान सहसा हा त्रास जाणवतो. मसाबाच्या (Masaba Gupta) मते यामध्ये प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो. अशा वेळी तुमच्या मैत्रीणींशी याविषयी संवाद साधत त्यांनी कोणत्या उपायांचा अवलंब केला हे जाणून घेणं फायद्याचं ठरेल असंही तिनं स्पष्ट केलं. पीसीओएस हा एक आजार नाही, असंही तिनं स्पष्ट केलं. 


वाचा : cholesterol: 'या' लक्षणांवरुन ओळखा तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलयं की नाही?


 


हा त्रास दूर करण्यासाठी आयुर्वेदात असणाऱ्या तरतुदी कायमच फायद्याच्या ठरल्या आहेत असं म्हणताना तिचा या उपचार पद्धतीवर असणारा विश्वास सर्वांसमक्ष आला.