फ्रान्स : जगभरात ओमायक्रॉन व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. असं असतानाच आता ओमायक्रॉननंतर अजून एक नवा व्हेरिएंट सापडला आहे. फ्रान्समध्ये हा नवा व्हेरिएंट सापडला असून हा जास्त म्युटेट असल्याचं म्हणणं आहे. IHU हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्याने सर्वांची चिंता वाढली आहे.


फ्रान्समध्ये 12 लोकांना IHU व्हेरिएंटची लागण 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्रान्समधील मेरसिली शहरात IHU व्हेरिएंटची 12 लोकांना लागण झाल्याचं समोर आलं आहे. या व्यक्ती कॅमेरूनमधून परतले होते. या लोकांना प्रथम ओमायक्रॉनची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान यावेळी त्यांच्या नमुन्यांची जीनोम सिक्वेसिंग करण्यात आली.


हा व्हायरसमध्ये 46 म्युटेशन


दरम्यान या व्हायरसच्या स्पाईक प्रोटीनवर 46 म्युटेशन झालेले तिथे ओमायक्रॉनमध्ये फक्त 32 म्युटेशन आढळले होते. हा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनहूनही अधिक वेगाने पसरण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. 


व्हेरिएंटला IHU नाव कसं दिलं


फ्रान्समध्ये मिळालेल्या या नव्या व्हेरिएंटचं नाव IHU असं आहे. फ्रान्समधीलच IHU Mediterrane Infection इथल्या काही अभ्यासकांनी या व्हेरिएंटचा शोध लावला असल्याने हेच नाव देण्यात आलं आहे. जागतिक आरोग्य संस्थेकडून अजून या व्हेरिएंटला विशेष नाव देण्यात आलेलं नाही.