दिल्ली : चीन आणि युरोप या भागात पुन्हा एकदा कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसतेय. ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA2 मुळे ही प्रकरणं वाढत असल्याचं चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघनेने देखील य़ा व्हेरिएंटबाबत चिंता व्यक्त केली आहे. मात्र कोरोनाचा हा व्हेरिएंट किती धोकादायक आहे ते पाहू.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओमायक्रॉनच्या या सब व्हेरिएंटला स्टील्थ नाव देण्यात आलेलं आहे. स्पाइक प्रोटीनमधील काही प्रमुख उत्परिवर्तन माहिती नसल्याने याबाबत अधिक सांगणं कठीण आहे. हे उत्परिवर्तन कोरोनाच्या संक्रमणाची माहिती करून देण्यास फार महत्त्वाचं असतं. 


चव न लागणं किंवा गंधांची क्षमता कमी होणं, अशी कोणतीही लक्षणं यामध्ये जाणवत नाहीत. या व्हेरिएंटच्या लक्षणांमध्ये प्रामुख्याने चक्कर येणं, अतिप्रमाणात थकवा येणं, ताप, खोकला, घसा खवखवणं, सर्दी यांचा समावेश होतो. ही लक्षणे साधारणपणे संसर्ग झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांमध्ये दिसू लागतात.


हा व्हेरिएंट ओमायक्रॉनपेक्षा अधिक संक्रमित?


काही प्राथमिक अहवालांनुसार, BA-2 आधीपासून अस्तित्वात असलेल्या ओमायक्रॉन BA-1 पेक्षा जास्त संसर्गजन्य असू शकतो. मात्र अजूनही हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे नाहीत. 


डॅनिश आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, BA-2 हा BA-1 पेक्षा 1.5 पट जास्त संसर्गजन्य असू शकतो. मात्र यामुळे अधिक गंभीर संसर्ग होत नाही.