मुंबई : पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की वातावरणामध्ये एक अल्हाददायक गारवा येतो. वातावरणातील थंडावा आणि हिरवळ यामुळे मन प्रसन्न होतं. अनेक प्रेमी युगुलांना हा काळ रोमॅन्टिक वाटतो. मग यादिवसात तुम्ही डेटवर जाणार असाल तर काही गोष्टींचं भान नक्की ठेवा म्हणजे हा काळ तुमच्यासाठी अजूनच थोडा खास होण्यास मदत होईल. 


पावसाळा अधिक रोमॅन्टिक करेल 'हे' खास टीप्स 


लॉन्ग ड्राईव्ह - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ताणतणावाच्या आणि नेहमीच्या रहाटगाडग्यातून बाहेर पडायचे असेल तर पावसाळ्यात एकदा लॉन्ग ड्राईव्हचा आनंद नक्की लुटा. नेहमीपेक्षा थोड्या हटके ठिकाणाचा विचार करा. मात्र बाईकवर किंवा गाडीने फिरणार असाल तर सुरक्षित ड्रायव्हिंग करा. पावसाळ्यात सुरक्षित ट्रेकिंगसाठी खास '10' टीप्स


आवडते जेवण 


खाण्यापिण्याच्या सवयी तुमच्या मिळत्याजुळत्या असतील, तुम्ही फुडी असाल तर पावसाळ्याच्य दिवसात आवडत्या खाण्याचा आनंद घ्या. कबाब, भाजलेला मका खाण्याचा आनंद या दिवसांमध्ये खाण्याचा आनंद घेण्याची मज्जा काही औरच असते. 


गाडीमध्ये रोमॅन्टिक गाणी 


लाजाळू किंवा प्रत्येक गोष्ट एकमेकांसोबत शेअर करण्याची, बोलण्याची तुम्हांला सवय नसेल तर केवळ एकत्र बसून आवडती गाणी ऐका. पावसात गाडी चालवता चालवता एकत्र रोमॅन्टिक गाणी ऐकण्याची मज्जा खास असते. पहिल्या भेटीत मुलामधल्या या '5' गोष्टींवर असते मुलींची नजर !


पावसात भिजा - 


पाऊस सुरू झाला की अनेकजण त्यापासून दूर पळतात. पण पावसाची खरी मज्जा पावसात भिजण्यात आहे. पहिल्या पावसात किंवा एखाद्या पावसात तुमच्या साथीदारासोबत नक्की पावसात भिजा. तुम्ही योग्य साथीदारासोबत असल्याचे '10' संकेत !