मुंबई : भारतात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. मात्र या दरम्यान महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी बनावट कोरोना लसीची प्रकरणंही समोर आली आहेत. अशा बाबींवर कारवाई करण्यासाठी सरकार प्रशासनाबरोबरच सामान्य लोकांनाही जागरूक करण्यात येत आहे. देशात कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पुतनिकच्या कोरोना लस कशा ओळखायच्या याबाबत मार्गदर्शक तत्त्वं जारी करण्यात आली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामान्य लोकांना कोरोना लस खरी आहे की बनावट याची खात्री लगेच करू शकत नाही. परंतु लस पुरवण्याचं काम पाहणाऱ्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना नव्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे नक्कीच मदत होईल. 


अतिरिक्त सचिव मनोहर अग्नानी यांच्या वतीने केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांचे सर्व अतिरिक्त मुख्य सचिव तसंच प्रधान सचिव यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, कोरोना लस वापरण्यापूर्वी काळजीपूर्वक प्रमाणित करणं आवश्यक आहे. यासोबतच, खरी कोरोना लस ओळखण्यासही सांगण्यात आले आहे.


बनावट कोविशिल्ड लसीची ओळख कशी कराल


  • सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचं लेबल, एसआयआय लेबल गडद हिरव्या रंगाचा असेल

  • हिरवा अॅल्युमिनियम फ्लिप-ऑफ सील

  • ब्रँडचे नाव COVISHIELD ट्रेड मार्कसह लिहिलं जाईल

  • जेनेरिक नावाचा मजकूर फॉन्ट ठळक अक्षरात असणार नाही

  • सीजीएस नॉट फॉर सेल प्रिंट केलं जाईल


बनावट कोव्हॅक्सिन लस कशी ओळखावी


  • लेबलवर अदृश्य (अदृश्य) यूव्ही होलिक्स असतील, जे केवळ यूव्ही लाइट्सच्या खाली दिसू शकतं.

  • COVAXIN चे 'X' दोन रंगात असेल. याला ग्रीन फॉइल इफेक्ट म्हणतात.


स्पुतनिक-व्ही लस कशी ओळखावी 


  • स्पुतनिक-व्ही रशियातील दोन वेगवेगळ्या प्लांटमधून आयात केलं जातंय. त्यामुळे यावर वेगवेगळी लेबल मिळतील.

  • लेबलवर दिलेली माहिती आणि डिझाईन समान असेल, फक्त प्लांटचं नाव वेगळें असेल.

  • स्पुतनिक-व्ही आतापर्यंत आयात केलेल्या कार्डबोर्ड पॅकमध्ये 5 कुपी आहेत. त्यांच्या पुठ्ठ्यावर इंग्रजीत नाव लिहिलं आहे