Acid Reflux: जेवल्यानंतर घशात होते जळजळ? कारण जाणून बसेल धक्का
Acid Reflux चं म्हणजे काय आणि होण्याचं कारण जाणून घ्या...
मुंबई : सध्याची आपली जीवनशैली आणि त्यासोबत खाण्याच्या सवयींमुळे आपल्याला अनेक त्रास होतात. कधी छातीत किंवा घशात जळजळीचा सामना करावा लागतो. या समस्येला इंग्रजीत हार्टबर्न किंवा अॅसिड रिफ्लक्स असे म्हणतात. ही एक सामान्य समस्या आहे, परंतु ती वेळीच सोडवणं खूप महत्वाचं आहे. जर आपण योग्यवेळी त्यावर उपाय केला नाही तर नंतर अनेक समस्या उद्भवू शकतात. दरम्यान, तुम्हाला माहित आहे का की झोपण्याच्या चुकीच्या सवयींमुळेही अशा समस्या उद्भवू शकतात. (Acid Reflux)
अॅसिड रिफ्लक्स म्हणजे काय?
अॅसिड रिफ्लक्स किंवा छातीत जळजळ ही पचनाशी संबंधित समस्या आहे. आपलं अन्न पचवण्यासाठी वापरले जाणारे अॅसिड अन्ननलिकेद्वारे घशात येते, ज्यामुळे हा त्रास होतो.
अॅसिड रिफ्लक्सची मुख्य लक्षणे कोणती आहेत
1.घसा खवखवणे
2.छाती किंवा घशात जळजळ
3.अन्न गिळण्यात अडचण
घशात जळजळ का होते?
आपल्या पोटात अन्न पचवण्यासाठी अॅसिडस असतात. हे अॅसिड पाचक रस म्हणून ओळखले जातात. अन्न हे अन्ननलिकेद्वारे पोटाकडे जाऊ लागते तेव्हा इसोफेजियल स्फिंक्टर नावाची एक वॉल्व ओपन होते आणि अन्न पोटात पोहोचते. जेव्हा अॅसिडचे प्रमाण वाढते तेव्हा ते अन्ननलिकेतून घशात परत जाऊ लागते, ज्यामुळे छातीत जळजळ होते.
झोपण्याची चुकीची पद्धत
घशा त होणारी जळजळ ही तुमच्या चुकीच्या झोपण्याच्या स्थितीशी संबंधित आहे, जर तुम्ही तुमच्या पोटावर किंवा पाठीवर जास्त झोपलात तर अॅसिड रिफ्लक्सची शक्यता वाढते. या कारणास्तव, बहुतेक आरोग्य तज्ञांचा असा विश्वास आहे की आपण फक्त आपल्या डाव्या किंवा उजव्या कुशीवरच झोपावं, जेणेकरून अशा समस्या टाळता येतील. (how to cure acid reflux heartburn may happen due to to your sleeping position)
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)