Fruits For Teeth Whitening: सुंदर स्मित हास्य चेहऱ्याच्या सौंदर्यात भर घालतं. त्यामुळे हसताना दात पिवळे दिसले तर वाईट वाटतं. त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वावर वाईट परिणाम होतो. दिवसभर तोंडातून दुर्गंधी येत असल्याने समस्या निर्माण होतात. त्यामुळे दातांची काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी बाजारात अनेक महागडे टूथपेस्ट उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रोडक्ट दात सुंदर आणि मोत्यासारखे स्वच्छ करण्याचा दावा करतात. आज आम्ही तुम्हाला घरगुती उपयांनी दातांची निगा कशी राखायची? याबाबत सांगणार आहोत. व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ सांगणार आहोत, जे खाल्ल्याने या समस्यांपासून कायमची सुटका होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्ट्रॉबेरी: स्ट्रॉबेरी फळ आरोग्यासाठी तसेच दात स्वच्छ करण्यासाठी गुणकारी आहरे. स्ट्रॉबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असतं. स्ट्रॉबेरीचं सेवन केल्याने दातांचा पिवळेपणा सहज दूर होतो. यासाठी स्ट्रॉबेरी घ्या, मॅश करा आणि 5 मिनिटे दातांना मसाज करा.


सफरचंद व्हिनेगर: सफरचंद व्हिनेगर दाताचा पिवळेपणा दूर करण्यासाठी प्रभावी आहे. तसेच आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. कारण यामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात. यासाठी एक कप पाण्यात व्हिनेगर टाका आणि ब्रशच्या साहाय्याने हळू हळू दात घासून घ्या, यामुळे दात स्वच्छ होतील. 


संत्री: केस आणि त्वचेसाठी संत्री सर्वोत्तम मानली जातात. जआपण त्वचा, डाग किंवा निस्तेजपणाबद्दल बोलतो तेव्हा आपल्या आहारात संत्र्याचा नक्की समावेश करा. संत्र्यामध्‍ये व्हिटॅमिन सी असते. यामुळे दातांची चमक टिकवून ठेवण्‍यास मदत करते. जर तुमचे दात पिवळे पडले असतील, तर संत्र्याची साल घेऊन दात नीट चोळा, दातांना चमक येऊ लागते.


खोबरेल तेल: नारळाचे पाणी आणि खोबरेल तेल हे दोन्ही आयुर्वेदानुसार सर्वोत्तम मानले जाते. बरेच लोक अजूनही नारळाच्या तेलाने दात स्वच्छ करतात. त्यामुळे दातांना चमक येते. यासाठी आधी एक चमचा तेल घेऊन तोंडात टाकून गार्गल करावे लागेल. असे सुमारे पाच मिनिटे करा, दररोज असे केल्याने तुमच्या दातांवरील पिवळेपणा निघून जाईल.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा अवलंब करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला जरूर घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)