मुंबई: पहाटेची साखरझोप म्हणजे अनेकांसाठी प्रिय. पण, हीच झोप जर कोणी मध्येच मोडली तर मात्र, भल्या पहाटेही अनेकांचा तिळपापड होतो. अगदी तुम्ही तुमच्या पार्टनरचीही झोपमोड केली तरीही त्याचा मुड ऑफ होऊ शकतो. म्हणूच पार्टनरला साखरझोपेतून हलकेसे उठवण्यासाठी वापरा ही रोमॅंटीक पद्धत. त्यासाठी खालील टीप्स तुमच्या कामी येऊ शकतात. 


चूंबन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

– तुमचा पार्टनर सकाळी झोपेत असताना त्याचे हलकेच एक चूंबन घ्या. यातून तूमचे प्रेम आणि काळजी घेण्याची वृत्ती पूढे येते. तुम्ही हा प्रयोग करून पहा झोपलेला पार्टनर लगेच जागा होईल. पण लक्षात ठेवा सकाळचे चंबन हे दीर्घ चूंबन नको. नाहीत पार्टनरचा मूड पून्हा बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.


‘त्या’ तीन शब्दांचा वापर


–  पार्टनरच्या कानात हलकेच ‘त्या’ तीन शब्दांचा वापर करा. पार्टनर साखरझोपेत अताना त्याच्य कानात ‘आई लव्ह यू’ या शब्दांचा वापर करा. अशा वेळी आपला टोन ठिक ठेवा. अत्यंत हलक्या आवाजात तूम्हाला हे वाक्य बोलायचे आहे. (ब्रेकअप झाल्यावर लोक कसे वागतात ? घ्या जाणून )


हलकासा स्पर्श


 – अत्यंत तोकड्या (?) कपड्यात तुम्ही पार्टनरच्या जवळ जा आणि त्याला अगदी बिलगून झोपा. तूमचा स्पर्श होताच पार्टनर लगेच जागा होईल. त्यानंतर हळूच बाजूला व्हा तूमचा हेतू सफल झालेला असेल. 


मंजूळ गाणे


– हलक्या आवाजात पार्टनरच्या आवडीचे गाणे किंवा गाण्याची एखादी धून सुरू करा. त्या आवाजाने पार्टनरला जाग येईल.


आवडीचा नास्ता


– पार्टनरच्या आवडीचा नास्ता बनवा. जर त्याला बेडवरतीच चहा प्यायची सवय असेल तर, त्याच्या आवडीचा चहा बनवून त्याला बेडवरतीच द्या.