मुंबई : डोळ्यांखाली Dark Circle आणि सूज येणं ही समस्या सामान्य आहे. आजकाल लोकांचे जीवन तणावाने भरलेले आहे. कुणाला अभ्यासाचं, कुणाला नोकरीचं तर कुणाला कौटुंबिक टेन्शन अशा अनेक समस्या असतात. हे सर्व लपवण्याचा आपण कितीही प्रयत्न केला तरी हा तणाव आपल्या चेहऱ्यावर Dark Circle च्या रूपाने दिसतो. कम्पुटरस्क्रीनवर सतत पाहण्यामुळे आणि वाढत्या वयामुळेही बहुतेक लोकांना Dark Circle ची समस्या असते. जर तुम्हाला Dark Circle पासून मुक्ती मिळवायची असेल तर काही टिप्स आणि घरगुती उपाय खूप उपयोगी ठरू शकतात. 


जाणून घ्या उपाय-


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बटाट्याचा रस (Potato Juice) 


Dark Circle दूर करण्यासाठी बटाट्याचा रस हा उत्तम उपाय आहे. बटाटा किसून डोळ्यांखाली ठेवा, साधारण 15 मिनिटांनी डोळे धुवा. त्याचा परिणाम पहिल्यावेळीच दिसू लागेल. ही रेसिपी काही दिवस सतत वापरल्यास काळी वर्तुळे पूर्णपणे निघून जातील. 


डोळ्यांची मालिश (Eye Massage)


डोळ्यांखाली मसाज केल्याने Dark Circle ची समस्याही दूर होते. खोबरेल तेलाने डोळ्यांखाली मसाज करा. याशिवाय डोळ्यांखाली मध लावून मसाज केल्यानेही फायदा होतो. व्हिटॅमिन-ई ने मसाज करणे देखील फायदेशीर आहे. अशा प्रकारे काही दिवसात Dark Circle दूर होतील.


लिंबू आणि टोमॅटो (Lemon and Tomato)


लिंबू आणि टोमॅटो देखील डार्क सर्कलची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहेत. टोमॅटो बारीक करून त्याचा रस काढा. त्यात लिंबू पिळून डोळ्यांखाली लावा. Dark Circle दूर होतील. 


काकडी (Cucumber)


काकडी Dark Circle दूर करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. काकडी कापून डोळ्यांवर मसाज करा आणि नंतर थोडा वेळ ठेवा. Dark Circle मध्ये आराम मिळेल. 


कोल्ड कॉम्प्रेसने सूज निघून जाईल (Cold Compress)


डोळ्यांच्या संसर्गामुळे आणि थकव्यामुळे Dark Circle आणि सूज येण्याची समस्या आहे. यापासून मुक्त होण्यासाठी, आपण थंड असणाऱ्या गोष्टीपासून डोळ्याला शेक देऊ शकतो. एक चमचा फ्रीजमध्ये थंड करून डोळ्यांवर ठेवा यामुळे तात्काळ दिलासा मिळण्यास सुरुवात होईल. याशिवाय तुम्ही टी बैग्स देखील वापरू शकता. चहा बनवताना टी बैग्सचा खूप उपयोग होतो. थंड झाल्यावर डोळ्यांवर ठेवल्यानं डोळ्यांना आराम मिळतो. 


मॉइश्चरायझर वापरा (Moisturiser)


मॉइश्चरायझेशनच्या कमीमुळेही डोळ्यांना सूज येण्याची समस्या उद्भवू शकते. यापासून सुटका हवी असेल तर डोळ्यांखाली मॉइश्चरायझर किंवा कोणतीही क्रीम लावा. यामुळे डोळ्यांची त्वचा निरोगी होईल आणि समस्या दूर होतील.


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)