मुंबई : मुली आपल्या शरीरावरचे नको असलेले केस काढून टाकण्यासाठी विविध उपाय करतात. हे केस काढून टाकण्यासाठी ते रेझर, वॅक्सिंग क्रीम आणि हेयर रिमूवल क्रीम वापरतात. ज्यामुळे अंडरआर्म्समध्ये काळ्या रंगाचे डाग येतात. या व्यतिरिक्त, डियोड्रन्टच्या वापरामुळे देखील हे घडते. अंडर आर्म्समध्ये काळ्या रंगाचे डाग असल्यामुळे मुली स्लीव्हलेस टॉप किंवा ट्यूब टॉप घालण्यास संकोच करतात. (how to lighten darker underarms)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमच्याकडे या समस्येवर उपाय आहेत. जर तुम्ही देखील काळ्या अंडरआर्म्सच्या समस्येमुळे त्रास्त असाल तर, आम्ही तुम्हाला काही सोपे आणि घरगुती उपाय सांगत आहोत. याचा वापर करुन काही दिवसातच तुम्ही मुक्त होऊ शकता. (home remedies for dark under arms)


बेकिंग सोडा


काळ्या अंडरआर्म्सपासून मुक्त होण्यासाठी बेकिंग सोडा हा एक चांगला पर्याय आहे. यासाठी, आपल्याला बेकिंग सोडामध्ये पाणी मिसळून घट्टं पेस्ट बनवावी लागेल. ही पेस्ट अंडरआर्म्समध्ये लावावी त्याला हलक्या हाताने घासावे आणि कोरडे झाल्यानंतर ते धुऊन टाकावे. ही पेस्ट आठवड्यातून दोन दिवस लावा आणि स्क्रब करा. निकाल लवकरच दिसेल.


खोबरेल तेल


खोबरेल तेल नैसर्गिकरित्या त्वचेवर तेज वाढविण्याचे कार्य करते. कारण त्यात व्हिटॅमिन ई गुणधर्म आहेत. अंडरआर्मच्या काळेपणापासून मुक्त होण्यासाठी नारळ तेलाने 15 मिनिटांसाठी मालिश करा आणि नंतर ते पाण्याने धुऊन टाका.


Apple सायडर व्हिनेगर


Apple सायडर व्हिनेगर नैसर्गिक क्लीन्सर सारखे कार्य करते. यासाठी, आपल्याला 2 चमचे apple सायडर व्हिनेगरमध्ये थोडा बेकिंग सोडा घालावा लागेल. हे मिश्रण आपल्या अंडरआर्म्सला लावावे. पेस्ट व्यवस्थित कोरडे झाल्यावर ते पाण्याने धुवावेत.


लिंबू


लिंबू एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे. अंडरआर्म्सच्या काळ्या भागात तुम्हाला अर्धा लिंबू घासावा लागेल. रोज आंघोळ करण्यापूर्वी लिंबू 2 - 3 मिनिटांपर्यंत अशा प्रकारे लिंबू घासावा . काही दिवसात काळ्या अंडरआर्म्सच्या  समस्येपासून तुम्ही मुक्त व्हा.


कोरफड


आपण कोरफडला झाडावरुन काढून लगेच त्याचे जेल काढून अंडरआर्म्सला लावा आणि 15 मिनिटांनंतर ते पाण्याने धुवा.


ऑलिव ऑइल


एक चमचा ऑलिव्ह ऑइलमध्ये एक चमचा ब्राउन शुगर मिसळून घरी एक्फोलीएटर तयार करा. त्याला काही मिनिटांपर्यंत अंडरआर्म्सला लावून ठेवा. कोरडे झाल्यानंतर पाण्याने धुवा.