मुंबई : तुमचे हात कितीही सुंदर अअणि स्वच्छ ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न केला तरीही नखांजवळची त्वचा काळवंडते. नखांभोवती काळसरपणा वाढण्यामागे त्वचेतील पिंगमेंटटेशन कारणीभूत ठरते. यामुळे क्युटिकल्स काळे होतात. 


का होतो नखांजवळचा भाग काळा? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरीरात व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता निर्माण झाल्यास नखांच्या आजूबाजूचा भाग काळा होतो. नखांवर नेलपॉलिश लावले तरीही आजूबाजूचा भाग, क्युटिकल्स काळेच दिसतात. मग तुमच्या बोटांचं सौंदर्य अधिक वाढवण्यासाठी आणि नखांच्या क्युटिकल्सचा रंग उजळवण्यासाठी हे  काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतील नक्की !   


क्युटिकल्सना उजळवणारे घरगुती उपाय -  


1. रात्री झोपण्यापूर्वी नखांजवळील त्वचेला ऑलिव्ह ऑईल लावा. ऑलिव्ह ऑईलच्या मसाजमुळे रंग खुलवण्यास मदत होते. हा उपाय नियमित केल्याने त्वचेचा रंग उजाळेल. 


2. दुधाची साय आणि व्हिटॅमिन ई कॅप्सुल मिसळून नखांजवळील त्वचेला लावल्यास फायदा होतो. यामुळे त्वचा मुलायम होते. त्वचेवरील काळसरपणा कमी होतो.  


3. बदामाचे तेल त्वचेला उजळवण्यास मदत करते. बदामाचे तेल क्युटिकल्सवर लावल्यानंतर हलका मसाज करा. यामुळे त्वचेचा रंग खुलतो.  


4. लिंबामुळेदेखील डेड स्किनचा थर काढून टाकण्यास मदत होते. लिंबाच्या रसामध्ये थोडी साखर मिसळा. या मिश्रणाच्या मसाजमुळे क्युटिकल्सचा रंग उजळण्यास मदत होते.