मुंबई : किडनीस्टोनचा त्रास अत्यंत वेदनादायी त्रासांपैकी एक आहे. वेळीच या समस्येकडे लक्ष न दिल्यास रूग्णाला वारंवार असह्य वेदनांचा आणि त्यातून निर्माण होणार्‍या समस्यांचा सामना करावा लागतो. जेव्हा मूत्राशयामध्ये खडे निर्माण होतात तेव्हा सुरूवातीच्या टप्प्यावर त्याचा धोका ओळखता आला तर काही घरगुती उपायांनी त्यावर मात करता येऊ शकते. मात्र मूतखड्याचा आकार मोठा असल्यास शस्त्रक्रियेच्या माध्यमातून मूतखडा काढावा लागतो.  मूतखड्याचा त्रास नेमका कशामुळे होतो?


आवळा - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किडनीस्टोनचा त्रास असलेल्यांनी आवळा खाणं फायदेशीर आहे. आवळा चूर्ण मुळ्यासोबत खाल्ल्याने किडनीस्टोनचा त्रास कमी होतो. 


तुळस - 


किडनीस्टोनच्या रूग्णांसाठी तुळशीची पानं फयादेशीर आहे. तुळशीपानांमध्ये व्हिटॅमिन बी घटक आढळतात. यामुळे किडनीस्टोनचा त्रास कमी होतो. 


वेलची - 


किडनीस्टोनचा त्रास कमी करण्यासाठी वेलची देखील फायदेशीर आहेत. चमचाभर वेलची, कलिंगडाच्या बीया, दोन चमचे खडीसाखर, कपभर पाणी मिसळून उकळा. सकाळ-संध्याकाळ हे मिश्रण प्याय्ल्यास मूत्रामार्गे किडनीस्टोन बाहेर पडण्यास मदत होते. 


जीरं - 


किडनीस्टोनच्या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी जीरं फायदेशीर आहे. जीरं आणि साखर समप्रमाणात मिसळा. या मिश्रणाला थंड पाण्यासोबत प्यावे. हे मिश्रण दिवसातून 3 वेळेस घेणं अधिक फायदेशीर आहे. यामुळे नैसर्गिकरित्या किडनीस्टोन बाहेर पडण्यास मदत होते.  मूतखडा टाळायचाय ? 'या' पदार्थांपासून रहा दूर