मुंबई : मूळव्याधीचा त्रास हा अत्यंत वेदनादायी असतो. अनेकजण या आजाराबद्दल खुलेपणाने बोलत नाहीत त्यामुळे हा आजार गंभीर टप्प्यात पोहचल्यानंतरच त्याकडे गांभिर्याने पाहिले जाते. त्यामुळे मूळव्याधीसारख्या आजाराकडे सुरूवातीच्या टप्प्यातच लक्ष देणे गरजेचे आहे. मूळव्याधीचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी काही टीप्स लक्षात ठेवणं गरजेचे आहे.म्हणजे हा त्रास गंभीर टप्प्यांपर्यंत पोहचणार नाही. सोबतच शस्त्रक्रियेसारख्या उपचारांची मदत घ्यावी लागणार नाही.  मूळव्याधीच्या रूग्णांंना पेट्रोलियम जेलीचा 'असा' वापर करणं ठरतं फायदेशीर !


 मूळव्याधीचा त्रास कसा ठेवाल आटोक्यात? 
 
 योग्य आहार - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मूळव्याधीचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी आहारात योग्य बदल करणे आवश्यक आहे. संतुलित आणि पोषक आहाराने मूळव्याधीचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते. मूळव्याधीचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी फायबरयुक्त भाज्यांचा, अन्नपदार्थांचा समावेश वाढवा. आहारात नियमित 50 ग्रॅम फायबर घटक घेतल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत करतात. आहारत दोन वाट्या हिरव्या भाज्या आणि किमान दोन फळांचा समावेश करणं आवश्यक आहे. आहारात 'या' भाजीचा समावेश कराल तर दूर होईल 'मूळव्याधी'ची समस्या ! 


 मुबलक पाणी - 


 बद्धकोष्ठता आणि मूळव्याधीचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी मुबलक पाणी पिण्याची सवय आवश्यक आहे. शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राखणे गरजेचे आहे. पाणी कमी असल्यास डीहायड्रेशनचा त्रास बळावतो. शरीरात पाणी कमी असल्यास आतड्यांमधून पाणी शोषले जाते. परिणामी आतडी, रक्तवाहिन्या शुष्क होतात. त्याचा दाब मलविसर्जनाच्या वेळेस रक्तवाहिन्यांवर येतो. उन्हाळ्यात मुबलक पाणी पिण्याची सवय वाढवतील या ट्रीक्स !


नियमित चाला - 


व्यायामाच्या मदतीनेही मूळव्याधीचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते. नियमित काही किलोमीटर चालण्याने मूळव्याधीचा त्रास कमी होण्यास मदत होते. यामुळे गुद्द्वाराजवळील भागातील सुजलेल्या रक्तवाहिन्यांवरील दाब कमी होण्यास मदत होते. मूळव्याधीचा त्रास आटोक्यात ठेवायला मदत करेल हा एक्सपर्ट डाएट प्लॅन


बद्धकोष्ठतेचा त्रास टाळा - 


बद्धकोष्ठतेच्या त्रासातूनच मूळव्याधीचा त्रास वाढतो. त्यामुळे सुरूवातीच्या टप्प्यात बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवत असल्यास त्यावर नियंत्रण मिळवा. पोट नियमित साफ होणं गरजेचे आहे. पोट साफ होत नाही? मग रात्री झोपण्यापूर्वी करा 'हे' उपाय