मुंबई : घरात घुसलेले उंदीर संपुर्ण सत्यानाश करतात. महत्वाच्या कागदपत्रापासून कपडे व इतर महत्वाच्या गोष्टी खाऊन नुकसान करतात. या नुकसानीमुळे या उदरांच करायचं का असा प्रश्न आपल्यासमोर उभा ठाकतो. अशावेळी घरगूती उपाय म्हणून आपण काय केले पाहिजे ते जाणून घेऊयात.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कांदे, लसूण, लवंगा अशा सर्व प्रकारच्या पद्धती आपण त्यापासून मुक्त होण्यासाठी वापरत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का की, केळीपासूनही उंदीर घाबरून पळून जातात. यामागचे कारण काय आहे ते जाणून घेऊया. 


केळीच्या सुगंधाने उंदीर पळून जातात, असे एका संशोधनात समोर आले आहे. संशोधनात असेही सांगण्यात आले आहे की उंदरांमध्ये स्ट्रेस हार्मोन्स आढळतात. केळीमध्ये एक विशेष सुगंध असतो जो एन-पेंटाइल एसीटेट नावाच्या संयुगामुळे असतो. या कंपाऊंडमुळे उंदरांमध्ये तणाव निर्माण होऊन ते केळीपासून दूर पळतात.


केळीपासून उंदीर पळत असल्याचे संशोधनात सिद्ध झाले असले तरी. केळीला फक्त नर उंदीर घाबरतात. कारण केळीमध्ये आढळणारे संयुग मादी उंदरांच्या मूत्रात आढळते. आपली पिल्लं नर उंदरापासून दूर ठेवण्यासाठी मादी उंदीर आपल्या लघवीत एक विशिष्ट प्रकारचे रसायन काढून टाकतात आणि या रसायनामुळे उंदरांमध्ये तणाव निर्माण होतो आणि ते त्यापासून दूर पळतात.


संशोधनात असे आढळून आले आहे की नर उंदीर जेव्हा मादी उंदरांच्या आसपास असतात तेव्हा ते विचित्र वागतात. याचे कारण शोधले असता असे आढळून आले की जेव्हा मादी उंदरांच्या मूत्रात एन-पेंटाइल ऍसिटेट नावाचे संयुग आढळते आणि त्यामुळे उंदीर विचित्र वागू लागले आहेत. हेच संयुग केळीमध्येही आढळते आणि संशोधकांनी नर उंदरांवर केळीचे तेल लावले तेव्हा ते मादी उंदरांच्या मूत्राप्रमाणेच वागले.