मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे पुरूषांमधील शुक्राणूंची संख्या कमी होत आहे. खाण्यापिण्याच्या सवयीवर शुक्राणूंची संख्या अवलंबून असते. प्रजनन क्षमतेसाठी शुक्राणू अतिशय महत्वाचे मानले जातात. यामुळे अनेकांना अपत्य न होण्याच्या अडचणी येतात. जर तुम्ही चरबीयुक्त पदार्थ खात असाल तर तुमच्या शुक्राणूत घट होऊ शकते. शुक्राणू वाढवण्यासाठी तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी योग्य असल्यापाहिजेत, मासे आणि हिरवा भाजीपाला तुमच्या खाण्यात आला पाहिजे. काही फर्टिलिटी क्लिनिकने याचा अभ्यास केला, तेव्हा लक्षात आलं आहे की, जे जास्त तेलकट म्हणजेच चरबीयुक्त पदार्थ खातात, त्यांच्या शुक्राणू म्हणजेच स्पर्म कमी होतात.


प्रजनन क्षमतेसाठी ओमेगा ३ फॅटी अॅसिड महत्वाचं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुरूषांच्या शरीरात ओमेगा ३ फॅटी अॅसिडचं प्रमाण योग्य असलं पाहिजे, ते मासे आणि भाज्यांच्या माध्यमातून मिळतं, यामुळे शुक्राणूंची संख्या चांगली राखण्यास मदत होते. तुमच्या शरीराला ओमेगा ३ फॅटी अॅसिडचा पुरवठा चांगला होत असेल, तर स्पर्म म्हणजेच शुक्राणूंची घनता देखील चांगली आढळून येईल. प्रति मिलीलीटर वीर्यामध्ये शुक्राणूंची संख्या दीड कोटी ते ३.९ कोटी असेल असली तर हे प्रमाण योग्य आहे, हे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेनुसार आहे.


मासे आणि हिरव्या भाज्या आहारात महत्वाच्या 


स्पर्मच्या काऊंटमध्ये घट येत आहे, असं एका अभ्यासातून समोर आलं आहे. पण यामुळे मानवजात नष्ट होण्याचा धोका आहे, असं देखील म्हटलं जातं, पण यात सर्वात मोठा परिणाम होतो, तो लाईफ स्टाईलचा. उत्तर अमेरिकेत, युरोपात, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सर्वात जास्त स्पर्म काऊंट ३५ वर्षांत अर्ध्यावर आला आहे. प्रजननासाठी एक शुक्राणूही पुरेसा असतो, पण जेव्हा पुरूषाच्या विर्यात ५ कोटी ते १५ कोटी शुक्राणूंची संख्या असेल, तेव्हा ते फेलिपीयन नालिकेत सहजच तरंगतात.


शुक्राणू कमी होणार नाहीत याची काळजी घ्या


पुरूषांनी आपल्या स्पर्मचं म्हणजेच शुक्राणूचं प्रमाण योग्य राखण्यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजेत. त्या अतिशय महत्वाच्या आहेत.
१) तंग अंडरवेअर घालणे टाळा.
२) कोणताही लैंगित संसर्ग होणार नाही, याची काळाजी घ्या.
३) नेहमी व्यायाम करा, कम्प्युटरवर बसून, तसेच दिवसभर बसून काम करणाऱ्यांसाठी हे महत्वाचे आहे.
४) व्यायाम करा, धावणे, वेगाने चालणे हे व्यायाम कधीही चांगले. पण अतिव्यायाम टाळा.
५) दारू पिणे टाळा, टेस्टास्टरॉन हॉर्मोन्सच्या क्षमतेवर परिणाम करतो, जो लैंगिक क्षमता कमी करतो.
६) पुरेशी झोप घ्या, ७ ते ८ तास झोप घेणे आवश्यक आहे, कारण कमी झोपेचे तुमच्या प्रजनन वाईट क्षमतेवर परिणाम होवू शकतात.
७) प्रजनन क्षमता वाढवायची असेल, तर ६ तासांपेक्षा कमी झोप नको.
८) एका अभ्यासानुसार असं म्हटलं जातं की, गरम पाण्याने अंघोळ केल्याने स्पर्म संख्या कमी होते. अंडकोषांचं तापमान वाढल्याने स्पर्म कमी होतात.