टी शर्ट घालताना या गोष्टींची जरुर काळजी घ्या
टी शर्ट घालणे प्रत्येक पुरुषाला आवडते. हे स्टायलिशही असते आणि कॅरी करण्यासही सोपे असते.
मुंबई : टी शर्ट घालणे प्रत्येक पुरुषाला आवडते. हे स्टायलिशही असते आणि कॅरी करण्यासही सोपे असते. त्यासोबतच आरामदायकही आहे. मात्र टी शर्ट घालण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. तुम्हालाही टी शर्ट घालायला आवडत असेल मात्र त्याची फिटिंग, कलर, फॅब्रिक, स्टाईल आणि फंक्शन हे सगळ पाहिलं पाहिजे. याचाच अर्थ तुमच्या शरीरावर ते फिट होतंय ना, त्याचा रंग तुम्हाला शोभतोय ना, त्याचे फॅब्रिक सूट करतंय ना तसेच कोणत्या फंक्शनला तुम्ही ते घालताय हे बघणही गरजेचं असतं.
डीप नेक शर्ट
व्ही नेकवाला टी शर्ट ग्लॅमर वर्ल्डशी संबंधित लोकांना ही चांगली चॉईस वाटत असेल मात्र असे टी शर्ट आपण रोज नाही घालू शकत. सार्वजनिक ठिकाणी असे टीशर्ट घालू नका.
स्लोगन टीशर्ट
कॅप्शन वा स्लोगन असलेले टीशर्ट घालण्यापूर्वी त्यावर लिहिलेल्या शब्दांचा तसेच वाक्यांचा अर्थ जाणून घ्या. अनेकदा फॅशन आहे म्हणून काहीही लिहिलेले टीशर्ट काहीजण घालतात. मात्र यावेळी त्यांचे हसे होते.
फिटिंग महत्त्वाची
जर तुमची बॉडी परफेक्ट असेल तर तुम्ही फिटिंगचे टीशर्ट घातल्यास ते सूट करतात. मात्र अंगाने बारीक असेल वा खूपच जाडे असाल तर असे टीशर्ट न घातलेले बरे.
टीशर्ट हा कॅज्युअल वेअर आहे त्यामुळे फॉर्मल ठिकाणी असे कपडे घालून जाणे टाळा. टीशर्ट खासकरुन जीन्सवर घातला जातो. त्यामुळे फॉर्मल शूज, स्टायलिश वॉच, ऑफिस बॅग आणि एक्झिक्युटिव्ह सनग्लासेस टीशर्टवर घालू नका.