वजन घटवण्यासाठी मदत करतो `हा` मांंसाहारी आणि टेस्टी पदार्थ !
अंड्यामध्ये फॅट्स असल्यामुळे दररोज अंडी खाल्याने वजन वाढते, हा अनेक जणांचा गैरसमज अाहे.
मुंबई : अंड्यामध्ये फॅट्स असल्यामुळे दररोज अंडी खाल्याने वजन वाढते, हा अनेक जणांचा गैरसमज अाहे. परंतु तुम्ही वजन घटवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्या आहारात अंड्याचा समावेश असणे अतिशय आवश्यक आहे. अंडी ही शरीरला पोषक असूनही वजन घटवण्यासाठी कशी मदत करतात ते पाहू या –
प्रोटिन्सने परिपूर्ण –
वजन घटवण्यासाठी स्नायूंना ताण देणारे व्यायाम केल्याने शरीरातील प्रोटिन्सचे प्रमाण बरेच कमी होते. यामुळे वजन घटवताना शारीरिक क्रियांसाठी व स्नायू मजबूत होण्यासाठी प्रोटिन्सची कमतरता निर्माण होऊ शकते. एका उकडलेल्या (100 ग्रॅम) अंड्यामध्ये 13 ग्रॅम प्रोटिन असते. यामुळे पुरुषांची 23% तर स्त्रियांची 28% प्रोटिन्सची गरज भागवली जाते. वजन घटवण्यासाठी हे 10 प्रोटिनयुक्त पदार्थही तुम्ही आहारात घेऊ शकता.मधुमेहींना अंड्याचे सेवन फायदेशीर, कमी होतो हृद्यविकाराचा धोका
फॅट्स कमी असतात –
अंड्यामध्ये शरीराला अपायकारक फॅट्स असतात असा बऱ्याच जणांचा समज असतो. परंतु प्रत्यक्षात त्यात फक्त 10 ग्रॅम फॅट्स असतात. त्यामुळे तुम्ही डाएटवर असतानाही अंडी खाऊ शकता.
पोषक घटक असतात –
अंड्यामध्ये पोषक घटक असल्याने ती शरीरासाठी फायदेशीर असतात. परंतु अंड्यातील पिवळ्या भागामध्ये पोषक घटकांबरोबरच कोलेस्टेरॉलही असते. म्हणून अंड्याचा पांढरा भाग दररोज खाल्ला तरी चालेल, परंतु वजन घटवणाऱ्यांनी अंड्याचा पिवळा भाग मात्र आठवड्यातून एकदाच खावा.
बराच वेळ भूक लागत नाही –
मेटॅबॉलिझममध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, नाश्त्याला अंडे व अंड्याइतक्याच कॅलरी असणारा दुसरा पदार्थ खाल्यास अंड्यामुळे बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते. यामुळे बीएमआय आणि कंबरेचा घेर कमी होण्यास मदत होते.
सहज उपलब्ध होते –
अंडी बाजारात सहज व माफक दरात उपलब्ध असतात. वजन घटवण्यासाठी आहारात अंड्यांचा नक्की समावेश करावा. तुम्ही अंडे कधीही खाऊ शकता. परंतु अंडे उकडूनच खावे, ऑमलेट किंवा बुरजी करून खाऊ नये.
टिप्स –
आहारात अंड्यांचा समावेश करण्याचे अनेक मार्ग असले तरी, तुम्ही त्यातील शरीराला लाभदायक असणारा पर्याय निवडणे आवश्यक आहे. असे काही पर्याय पुढे दिले आहेत :
अंडे उकडून खाणं हा अधिक पौष्टीक पर्याय आहे. यामध्ये फॅट्स कमी असतात. अंडे लवकर शिजते व पचनास हलके असते. फक्त त्यातील पिवळा भाग मात्र खाऊ नये. जेवणासाठी तुम्ही अंडे खाण्याचा विचार करत असाल तर ब्राउन ब्रेडबरोबर उकडलेले अंडे खाऊ शकता. यातून तुम्हांला फायबर आणि प्रोटिन मधून तुम्हांला दिवसभरासाठी ऊर्जा मिळेल.