मुंबई : पुरुष असो वा महिला वाढलेले पोट, लठ्ठपणा ही सर्वांचीच समस्या बनत चाललीये. वजन कमी करण्यासाठी लोक हल्ली काय काय करत नाही. अनेकाविध उपाय केले जातात.  मात्र बऱ्याचदा हे उपाय लागू पडत नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरगुती उपायानेही तुम्ही लठ्ठपणा कमी करु शकता. लिंबू पाण्यात गूळ मिसळून प्यायल्याने अनेक फायदे होतात.


लिंबामध्ये अॅसिडिक कंटेट अशतात ज्यामुळे कॅलरी बर्न होण्यास मदत होते.. रोज सकाळी लिंबू पाणी आणि गूळ एकत्र मिसळून प्यायल्यास पाचनक्रिया सुधारते.


हृदय आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढते


लिंबामध्ये व्हिटामिन सी असते जे हृदयासाठी चांगले असते. तसेच ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठीही फायदेशीर आहे. 


त्वचेचा पोत सुधारतो


दररोज लिंबू पाणी प्यायल्यास शुष्क त्वचेपासून सुटका होते. तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. त्वचेचा पोतही सुधारतो. 


पचनक्रिया सुधारते


लिंबू पाण्याचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. तसेच वजन कमी करण्यास मदत होते.