मुंबई : त्वचेचा तजेला परत आणण्यासाठी चारकोल मास्क अतिशय फायदेशीर ठरतो. चारकोल मास्कमुळे त्वचा उजळ होण्यास मदत होते. त्याचबरोबर ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सपासून सूटका होते. तुम्ही घरच्या घरीही चारकोल मास्क बनवू शकता. जाणून घेऊया चारकोल मास्क कसा तयार करावा आणि त्याचे फायदे...


कसा बनवावा पील ऑफ मास्क


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पील ऑफ मास्क बनवण्यासाठी सर्वात आधी ३ अॅक्टीव्हेटेड चारकोलच्या कॅप्सूल्स घ्या. या कॅप्सुल्समध्ये व्हिटॉमिन ऑईल, बेंटोनाईट माती, ग्लिसरीन आणि मध घालून पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये थोडे पाणी घालून चेहऱ्यावर लावा. १० मिनिटांनंतर मास्क चेहऱ्यावरून पील करा. आणि चेहरा कोमट पाण्याने धुवा.


पिंपल्स असल्यास


पिंपल्स पासून सुटका मिळवण्यासाठी चमचाभर कोरफड जेल, एक चमचा हळद आणि एक चमचा अॅक्टीव्हेटेड चारकोल घालून पेस्ट तयार करा. यात थोडे पाणी घालून पॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि सुकू द्या. त्यानंतर पाण्याने चेहरा धुवा.


बंद पोर्ससाठी


बंद पोर्स साफ करण्यासाठी एक चारकोल कॅप्सूलमध्ये गुलाबपाणी घालून पेस्ट तयार करा. १० मिनिटांनी चेहरा धुवा.