डासांंना दूर ठेवण्यासाठी घरच्या घरी बनवा केमिकल फ्री mosquito-repellent Oil
पूर्वी सायंकाळच्या वेळेस दिवा लावल्यानंतर घरात हामखास धूप केला जात असे.
मुंबई : पूर्वी सायंकाळच्या वेळेस दिवा लावल्यानंतर घरात हामखास धूप केला जात असे. यामुळे घरात प्रसन्न वातावरण राहते सोबतच मच्छरांचा त्रासही दूर राहण्यास मदत होत असे.
आजकाल संध्याकाळची वेळ झाली की डासांना दूर करण्यासाठी टेबलटॉप मशीन वापरतात. मात्र त्यामधील केमिकल घटकांमुळे अनेकांना अॅलर्जी, सर्दी,खोकल्याचा त्रास होतो. गरजेनुसार रिपलेंट लिक्विड भरून हिटींग मशीनामध्ये टाकल्यास डास दूर राहतात. मग रिपलेंट लिक्विड घरच्या घरी बनवले तर ? घरगुती आणि नैसर्गिक घटकांचा वापर करून नॅचरल रिपलेंट लिक्विड बनवले तर सुरक्षित मार्गाने घरातून डासांना पळवणं शक्य होते.
घरच्या घरी कसे बनवाल नॅचरल रिपलेंट ऑईल?
पूर्वी ज्या घटकांचा वापर धूपाकरिता केला जात असे त्याच घटकांच्या मदतीने आता घरच्या घरी नॅचरल रिपलेंट लिक्विड बनवता येऊ शकते. त्यामुळे पहा कसा बनवाल घरच्या घरी नॅचरल रिपलेंट ऑईल
साहित्य -
रिफीलची एक बॉटल
2 मोठे चमचे कडुलिंबाचे तेल
5 कापराच्या वड्या
कसे बनवाल हे नॅचरल रिपलेंट ऑइल ?
कापराच्या वड्यांची बारीक पूड करा. त्यामध्ये कडुलिंबाचे तेल मिसळून रिफिल बॉटलमध्ये मिसळा. तुमच्याकडे मोठी बॉटल असेल तर नारळाचं तेलही मिसळता येईल. रिफिल बॉटलमध्ये टाकण्यापूर्वी तेल नीट मिक्स करा. कापूर आणि कडुलिंबाच्या तेलाचा कोणताक दुष्परिणाम होणार नाही. कडूलिंबामध्ये जे एन्टीप्रोटोजोल कम्पाऊंड असतात त्यामुळे डास दूर होण्यास मदत होते.
कडुलिंबाच्या तेलाऐवजी तुम्ही टी ट्री ऑईलदेखील मिसळू शकता. सुमारे 15 दिवस एक रिलिफ बॉटर वापरता येऊ शकते. यामुळे आरोग्याचं रक्षण होईल सोबतच पैशांचीही बचत होऊ शकते.