मुंबई : आवळा हा अत्यंत औषधी आहे. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. त्याचबरोबर शरीर तंदुरुस्त होण्यास मदत होते. आवळ्याचे सेवन जितके फायदेशीर आहे. तितकेच त्याचे तेलही केसांसाठी उपयुक्त आहे. आवळ्याचे गुणधर्म जाणून तुम्ही बाजारातील तेल वापरता? पण त्यात केमिकल्स असण्याची शक्यता असते. तर घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही आवळ्याचे तेल बनवू शकता. पाहा तेल बनवण्याची प्रक्रिया...


आवळ्याचे तेल बनवण्याची कृती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आवळ्याचे तेल बनवण्यासाठी आवळा कापून त्याची पेस्ट बनवा. त्यानंतर पेस्ट खोबरेल तेलात घालून आठवडाभरासाठी बाटली बंद करुन ठेवा. आठवडाभरानंतर  तेल गाळून घ्या. आवळ्याचे तेल तयार.


तेल वापरण्याची पद्धत


आठवड्यातून दोनदा तेलाने स्कॉल्पला मसाज करा. मसाज हलक्या हाताने बोट्यांच्या साहाय्याने करावा. त्यानंतर ३०-४० मिनिटांनी केस सौम्य शॅम्पूने धुवा.


तेल लावण्याचे फायदे


  • आवळ्याचे तेल कॅल्शियम, व्हिटॉमिन सी, आयर्न आणि फॉस्फोरस याने युक्त असते. त्यामुळे केस आणि स्कॉल्प हेल्दी राहण्यास मदत होते. 

  • याशिवाय केस पांढरे होण्यास आळा बसतो. 

  • केस मजबूत व दाट होतात. 

  • केस वाढण्यास मदत होते. 

  • केस मऊ मुलायम होतात.