मुंबई : सूर्यप्रकाशातून शरीराला व्हिटॅमिन डीचा पुरवठा होतो. परंतू त्यासोबतच घातक सूर्यकिरणांमुळे आरोग्याला अपाय होऊ शकतो. त्वचा काळवंडू नये किंवा टॅन होऊ नये म्हणून उन्हात फिरताना आपण हमखास सनस्क्रीन लावून बाहेर पडतो. परंतू पावसाळ्यात याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. या दोन तासाच्या वेळेत उन्हात मूळीच विनाकारण फिरू नका !


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पावसाळ्याचे दिवस असले तरीही या दिवसांमध्ये योग्य कपडे, सलग्लास आणि किमान 50 एसपीएस असलेली सनस्क्रीन  लोशन लावून बाहेर पडणं आवश्यक आहे. केवळ SPF पाहून नव्हे तर 'या' घटकांची तपासणी करूनच सनस्क्रिन निवडा


कोणती काळजी घ्याल?  


पावसाळ्याच्या दिवसातही नियमित त्वचेवर सनस्क्रीन लोशन लावणं गरजेचे आहे. या दिवसात उन्हात बाहेर पडताना किंवा इनडोरही सनस्क्रीन लोशन लावा. 


मुंबई सारख्या दमट वातावरण असणार्‍या शहरात त्वचेवर चिकटपणा वाढतो. अशावेळेस चेहर्‍यावरील छिद्र क्लॉग होणार नाही याची काळजी घ्या.  


तुमची त्वचा सेन्सिटीव्ह असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सनस्क्रीन निवडा. 


तुमच्या सतत वापरात राहणार्‍या जागी, घरातून बाहेर पडताना हमखास नजरेसमोर राहील अशा ठिकाणी ठेवा.  या '4' घरगुती उपायांनी अवघ्या आठवड्याभरात त्वचा पुन्हा होईल तजेलदार