मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे  (Corona Virus) अगोदरच लोक हैराण आहेत. कारण या कोरोनामुळे (Covid-19) जगभरात आतापर्यंत ७ करोड ७७ लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत १७ लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. मात्र, आता ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोनाच्या (New Corona Virus) रुपामुळे आणखी चिंता वाढवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या या नव्या रुपामुळे अधिक लोकांना बाधा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे भारतासह अनेक देशात ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांना बंदी केली आहे. आता या नव्या कोरोना व्हायरसवर तज्ज्ञांनी आपली मत मांडली आहे. हा नवा व्हायरस लसीने आटोक्यात आणण्यात येईल का? या नव्या व्हायरसपासून आपण स्वतःचा कसा बचाव करू शकतो? अशी माहिती देखील यावेळी दिली आहे. 


ब्रिटनच्या नव्या कोरोना व्हायरसवर तज्ज्ञांची प्रतिक्रिया 


दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील डॉ. ए.के. वार्ष्णेय यांनी म्हटलं की,'व्हायरस आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी म्यूटेट राहत असतात. कोरोना व्हायरचे अनेक स्ट्रेन या अगोदरही सापडले आहेत. मात्र त्यांचा जास्त प्रभाव पाहायला मिळालेला नाही. ब्रिटनमध्ये आता जे नवीन प्रकार समोर आले आहेत ते न्यू म्युटेटेड व्हायरसने संक्रमित आहेत. याची तीव्रता सर्वाधिक आहे. यामुळे तेथे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अनेक देशांनी यूकेमधून आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्यात आली आहे. जेणे करून याचा त्रास इतर देशांना होणार नाही. या नव्या कोरोनाच्या रुपाला न घाबरता आपण नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.'


नव्या कोरोनावर आताची लस कामी येईल का? 


डॉ. ए. के. वार्ष्णेय पुढे म्हणाले की,' कोरोना व्हायरसचे म्यूटेशन आणि संशोधकांचे त्यावरील संशोधन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. इन्फ्लूएंजा व्हायरस कोरोनाच्या तुलनेत अधिक वेगाने म्यूटेट करत आहे. यावर्षी या संक्रमणावर लस येणार आहे.'



आजारी व्यक्तीने थंड पाण्याचा वापर करावा का? 


थंडीच्या काळात जेव्हा आपण गार पाण्याने आंघोळ करतो तेव्हा शरिराचे तापमान लगेचच कमी होते. यामुळे आपल्या शरिरातील धमण्या देखील संकुचित पावतात. यामुळे हृदय, मेंदूत होणारा रक्त पुरवठा अचानक कमी होतो. यामुळे तुम्हाला नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे थंड पाणी पिणे अथवा थंड पाण्याने आंघोळ करणे धोकादायक आहे.