रिमूव्हरशिवाय नेलपॉलिश काढण्याचे ६ सोपे पर्याय!
नेल पॉलिश लावल्याने नखांचे सौंदर्य खुलते.
मुंबई : नेल पॉलिश लावल्याने नखांचे सौंदर्य खुलते. पण नेलपॉलिश लावताना ती नखाबाहेर लागल्यास ती पुसणे काहीसे अवघड होते. तुम्हालाही याचा अनुभव आला असेल. त्यामुळे असे काही घरगुती उपाय ज्यामुळे नेलपॉलिश काढणे अतिशय सोपे होते.
अल्कोहोल
नेलपॉलिश अगदी सहज काढण्याचा सोपा उपाय म्हणजे अल्कोहोल. काहीच वेळात तुम्ही अल्कोहोलच्या मदतीने नेलपॉलिश काढू शकता.
व्हिनेगर
अल्कोहोल घरात असेलच असे नाही. पण व्हिनेगर असण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे नेलपॉलिश काढण्यासाठी कापसाच्या बोळ्यावर व्हिनेगर घ्या आणि हळूहळू नखांवर लावा.
लिंबू
नेलपॉलिश काढण्याचा लिंबू हा अतिशय नैसर्गिक उपाय आहे. नखांवर लिंबू घासल्याने नेलपॉलिश सहज निघते. त्याचबरोबर गरम पाण्यात साबण आणि लिंबाचा रस घालून त्यात ५-६ मिनिटे हात बुडवून ठेवा. त्यामुळे नेलपॉलिश सहज निघेल.
डियोड्रन्टं
हा उपाय कदाचित तुम्हाला माहित नसेल पण नेलपॉलिश काढण्यासाठी नखांवर डियोड्रन्टं स्प्रे करा. त्यात नेलपॉलिश रिमूव्हरसारखे घटक असतात. त्यामुळे त्यातून नेलपॉलिश अगदी सहज काढू शकाल.
गरम पाणी
इतर कोणतेही उपाय उपलब्ध नसतील तर नेलपॉलिश काढण्यासाठी तुम्ही गरम पाण्याचा वापर करु शकता. एका मोठ्या भांड्यात सुमारे १० मिनिटे बोटे बुडवून ठेवा आणि कापसाचा बोळा नखांवर घासा. नेलपॉलिश निघून जाईल.
टूथपेस्ट
घरात टूथपेस्ट कायम असते. नेलपॉलिश काढण्यासाठी हा उपाय योग्य आहे. त्यासाठी कापसाच्या बोळ्यावर टूथपेस्ट लावा आणि बोटांवर चोळा.