जेवताना पाणी पिण्याची सवय कशी टाळाल
जेवताना अनेकांना सतत पाणी पिण्याची सवय असते. ही सवय आरोग्याला त्रासदायक ठरते. त्यापासून वेळीच दूर न झाल्यास अनेक आजारांना निमंत्रण मिळते.
मुंबई : जेवताना अनेकांना सतत पाणी पिण्याची सवय असते. ही सवय आरोग्याला त्रासदायक ठरते. त्यापासून वेळीच दूर न झाल्यास अनेक आजारांना निमंत्रण मिळते.
जेवताना पाणी पिणे ही सवय अनेकांना लहानपणापासून असते. या सवयीपासून लगेजच सुटका मिळणे शक्य नाही. परंतू या काही साध्या-सोप्या टीप्सने तुम्ही यावर मात करू शकता.
जेवणात मीठाचा वापर कमीत कमी करा –
मीठामुळे आपल्याला सतत तहान लागते. त्यामुळे आहारात आवश्यक तेवढाच मीठाचा वापर करा. अळणी जेवणात वरून मीठ घालू नका.
जेवण चावून खा, गिळू नका –
‘प्रत्येक घास 32 वेळा चावून खावा.’ असे म्हटले जाते. कारण अन्न चावून खाल्ल्याने लाळनिर्मीतीला चालना मिळते व पचनही सुधारते. तसेच अन्न चावून खाल्ल्याने त्याचे विघटन आणि पचन सुधारते. याबरोबरच अन्न चावून खाल्ल्याने लाळनिर्मिती वाढते आणि पाणी पिण्याची इच्छा कमी होते.
जेवणाआधी 30 मिनिटे पाणी प्या –
एक्सपर्ट सल्ल्यानुसार, वजन घटवण्यासाठी तसेच उत्तम मेटॅबॉलिक रेटसाठी जेवणापूर्वी 30 मिनिटे अगोदर साधे पाणी प्यावे. यामुळे जेवताना पाणी पिण्याची इच्छा कमी होते.