Side Effects Of Refrigerated Eggs: सहसा लवकर खराब होणारी एखादी गोष्ट (perishable items) आपण जास्त प्रमाणात घरी आणतो, त्यावेळी अशा वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी एका जागेला सर्वचजण प्राधान्य देतात. ती जागा म्हणजे घरात असणारा फ्रिज. (Vegetables) भाज्या म्हणू नका, मासे म्हणू नका किंवा मग अंडी (Eggs). हे पदार्थ फ्रिजमध्ये सुरक्षित राहतात, दीर्घकाळ टीकतात. हे आपण सर्वच जाणतो. भाज्या, फळं ठीक. पण, अंडी फ्रिजमध्ये ठेवणं खरंच योग्य आहे का? तर, नाही. अंडी फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यामध्ये असे काही बदल होतात जे शरीरासाठी पोषक नसतात. 


उकडताना तुटतील अंडी (Boiled Eggs)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंडी फ्रिजमध्ये ठेवल्यामुळं ती कमकुवत होतात. उकडताक्षणी पटकन तुटतात. त्या तुलनेनं सर्वसामान्य तापमानावर ठेवलेल्या अंड्यासोबत असं होत नाही. 


Bacteria वाढतात


अंडी फ्रिजमध्ये चुकीच्या पद्धतीनं ठेवल्यास त्यामध्ये साल्मोनेला बॅक्टेरिया वाढतात. ज्यामुळं आरोग्याला हानी पोहोचते. 


अंड्यांतील पोषक तत्त्वं कमी होतात (nutrients in eggs)


अंडी खाणं अरोग्यासाठी कितीही गुणकारी असलं, तरीही ती फ्रिजमध्ये ठेवल्यास मात्र त्यामध्ये असणारी पोषक तत्वं कमी होतात. ज्यामुळं अंड्यांचं सेवन करुनही त्यापासून मिळणारे पोषक घटक शरीराला पुरवले जात नाहीत. 


हेसुद्धा वाचा : Momos Disadvantages : मोमोज खाणाऱ्यांनो लक्ष द्या! अन्यथा भोगावे लागतील वाईट परिणाम


अंडी संक्रमित होतात 


फ्रिजमध्ये ठेवलेली आणि सर्वसामान्य तापमानावर ठेवलेली अंडी चवीला वेगवेगळी लागतात. बऱ्याचदा जुन्या अंड्यांतून वासही येऊ लागतो. फ्रिजमध्ये अंडी ठेवल्यास ती सहजपणे संक्रमित होऊन इतर गोष्टींचंही त्यामुळं नुकसान होतं. 


(ही माहिती घरगुती उपायांवर आधारित आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही. )