Momos Side Effects: मोमोज खाणाऱ्यांनो लक्ष द्या! अन्यथा भोगावे लागतील वाईट परिणाम

Momos Side Effects : मोमोजचं नाव घेतलं की तोंडाला पाणी सुटतं. आजकालच्या युगात विशेषत: लहान मुलं आणि तरुणांमध्ये मोमोजची क्रेझ दिसून येते. पण हे रस्त्यावरील मोमोज जास्त खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला धोका आहे. 

Updated: Nov 25, 2022, 11:17 AM IST
Momos Side Effects: मोमोज खाणाऱ्यांनो लक्ष द्या! अन्यथा भोगावे लागतील वाईट परिणाम title=
momos eating can cause many dangerous diseases street food red chilly sauce chutney nmp

Negative Health Issue Of Eating MOMOs: मोमोजप्रेमींसाठी (Momos Lover) महत्त्वाची बातमी आहे. उत्तर भारतामध्ये (North India) मोमोज (Momos) खूप लोकप्रिय आहे. पण भारतातही मोमोजप्रेमींची संख्या जास्त आहे. जर तुम्ही आज मोमोज खाण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी वाचा.  कारण रस्त्यावरील फास्ट फूड (Fast Food) मोमोजचं अती सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्याला (Health) धोका आहे. शिवाय मोमोजसोबत मिळणारी लाल चटणी ही आपल्या जीवावर बेतू शकते. तुम्ही वरच्या वरच मोमोज खात असाल तर तुम्ही हॉस्पिटलची पायरी चढण्यासाठी तयार राहा.(momos eating can cause many dangerous diseases street food red chilly sauce chutney)

 

1- लठ्ठपणा (obesity)

मोमोज बनवण्यासाठी मैद्याचा बनवण्यासाठी पिठाचा वापर केला जातो. मैद्यात मोठ्या प्रमाणात स्टार्च आढळतो. जे खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो. जास्त पीठ खाल्ल्याने रक्तातील कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडची पातळी वाढते. त्यामुळे वेळेच सावधान व्हा अन्यथा तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागतील.  

2- स्वादुपिंडाला इजा (Pancreatic injury)

मोमोज मऊ करण्यासाठी अॅझोडीकार्बोना माईड, बेंझॉयल पेरोक्साइड सारखे घटक पिठात मिसळले जातात. जे आरोग्यासाठी खूप वाईट आहे आणि शिवाय त्यामुळे शरीराच्या स्वादुपिंडाला हानी होऊ शकते. 

3- मधुमेहाचा धोका (diabetes)

मोमोज मऊ बनवण्यासाठी वापरण्यात येणारे घटक स्वादुपिंड खराब करतात, त्यामुळे इन्सुलिन हार्मोनचा स्राव योग्य प्रकारे होत नाही आणि मधुमेहाचा धोका वाढतो.जे लोक जास्त मोमोज खातात त्यांना मधुमेहाचा धोका वाढतो. 

4- खराब साहित्याचा वापर 

जे लोक नॉनव्हेज मोमोजचे शौकीन आहेत ते मोमोज मोठ्या उत्साहाने खातात, पण त्यात भरलेल्या चिकन किंवा मटणाचा दर्जा अनेकदा खराब असतो.त्यामुळे तुम्ही अनेक रोगांना आमंत्रण देतात. 

5 - लाल चटणी अधिक धोकादायक

लाल चटणीसोबत मोमोज खाण्याची मजाच काही औरच असते. पण ही चटणी तुमच्या प्रकृतीसाठी चांगली नाही. जास्त मसालेदार खाल्ल्याने मूळव्याध सारखे आजार होऊ शकतात.  

(डिस्क्लेमर - वरील दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन जीवनात याचा वापर करायचा झाल्यास डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)