मुंबई : भारतीय खाद्यसंस्कृती आणि ग्रेव्ही हे अतुट नात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमटीपासून रस्सा भाजीपर्यंत सार्‍यातच टॉमेटोचा सर्रास वापर केला जातो. हिवाळ्यात भाज्या मुबलक आणि स्वस्त मिळतात. अशावेळेस तुम्ही हमखास टोमॅटो अधिक प्रमाणात विकत घेत असाल पण ते योग्यप्रकारे न ठेवल्यास फ्रीजमध्ये ठेवूनही खराब होतात. परिणामी अनेक टोमॅटोंची नासाडी होते. मग जाणून घ्या नेमके टोमॅटो साठवायचे कसे ? 


कच्चे टोमॅटो साठवा 


तुम्ही खूप प्रमाणात टोमॅटो विकत घेणार असाल तर ते कच्चे विकत घ्या. फ्रीजमध्ये ते ठेवताना पेपरबॅग किंवा कार्डबोर्ड बॉक्समध्ये साठवून ठेवा. त्यांचा रंग लाल होईपर्यंत ते थंड ठिकाणी ठेवावेत. 
बाजारात केमिकल्सचा वापर करून  टोमॅटो पिकवले जातत. 


पिकलेले टोमॅटो नीट ठेवा 


पिकलेले टोमॅटो आणले असतील तर ते रूम टेम्परेचरमध्ये ठेवा. थेट सूर्यप्रकाशापासून लांब ठेवा. पिकलेले टोमॅटो एकमेकांना फार चिकटून ठेऊ नका.तसेच त्याचा वेळीच वापर करा.  फार काळ ठेवल्यास ते खराब होऊ शकतात.  


अति पिकलेले टोमॅटो 


खूपच पिकलेले टोमॅटो तुम्ही विकत घेतले असतील तर ते फ्रीजमध्ये ठेवा. फ्रीजमधील ताप्मान टोमॅटोंना अधिक पिकण्यापासून दूर ठेवतील. फ्रीजमधून काढून थेट टोमॅटो जेवणात वापरू नका. त्यांना रूम टेम्परेचरमध्ये येण्यास वेळ द्या. म्हणजे त्याची चव टिकून राहते.