मुंबई : थंडी निघून गेली असून आता संपूर्ण महाराष्ट्रभर उन्हाच्या झळा लागतायत. दवाखाने आणि रूग्णालयात देखील प्रचंड रूग्णांच्या रांगा दिसून येतायत. अचानक तापमान वाढल्याने लहान मुलांसह वयोवृद्धांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होऊ लागलाय. उष्णतेमुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याने हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी रुग्णांची गर्दी होऊ लागली आहे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रूग्णांमध्ये सर्वाधिक लहान मुलं आणि वयोवृद्ध उपचारासाठी आल्याचं समोर आलंय. त्यामुळे या उष्णतेच्या लाटेत नागरिकांनी म्हणजे खासकरून पालकांनी लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. 


या दिवसांत लहान मुलांची काळजी कशी घ्याल


  • या दिवसांत लहान मुलांना सुती कपडे घाला. सिंथेटिक कापडाचा वापर करू नका. यामुळे मुलांना घामोळ्या येतील

  • लहान मुलांना झोपण्याच्या वेळी गादीवर सुती चादर अंथरा. 

  • उन्हाळ्यामध्ये लहान मुलांसाठी डायपरचा वापर अधिक करू नका. याच्या अतीवापराने त्वचेला इजा होऊ शकते. 

  • या दिवसांत लहान मुलांना मालिश करू नका. यामध्ये वापरलेल्या तेलाने घाम शरीरावर चिटकून राहू शकतो.

  • दुपारच्या वेळी ऊन जास्त असतं. त्यामुळे यावेळी लहान मुलांना घराबाहेर काढू नका


भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानातील तापमान 40 ते 42 अंशाच्या आसपास असून, गुजरात आणि महाराष्ट्रात बहुतांश शहरांचे विशेषत: कोकणातील अनेक शहरांचे कमाल तापमान 38 ते 39 अंशादरम्यान नोंदवण्यात आले आहे.


उत्तरेकडून दक्षिणेकडे दाखल झालेल्या उष्णतेच्या लाटेनं मुंबईच्या कमाल तापमानात सातत्याने भर घातली आहेत. त्यामुळे मुंबईकर हैराण झाले असून आरोग्य सांभाळा असं आवाहन करण्यात आलं आहे.