Fenugreek And Rice Water For Hair Growth : प्रत्येकाला वाटतं आपले केस घनदाट लांब आणि सडक असावे. यासाठी अनेक जण पार्लरमध्ये जाऊन महागाचे हेअर ट्रीटमेंट घेतात. पण तुमच्या किचनमधील तांदूळ, मेथी, अळशी आणि कांदा यातून तुम्ही कमी खर्चात आणि निसर्गरित्या घरगुती उपाय करुन केसांच्या अनेक समस्या दूर करु शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केस गळणे, कोंडा, कोरडे कुरळे केस गुळगुळीत आणि चमकदार बनविण्यास हे घरगुती उपाय तुम्हीला नक्कीच मदत करतील. अगदी Keratin treatment देखील तुम्ही घरात (Keratin treatment at home) करु शकता. केसांची जलद वाढ होण्यासही आजपासून तुम्ही हे उपाय सुरु करा. (How To Use Fenugreek And Rice Water flaxseeds For Hair Growth Keratin treatment at home  in marathi)



मेथीच्या दाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, तसंच व्हिटॅमिन ए, के, सी, लोह, फॉलिक अॅसिड आणि इतर अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात. तर तांदळाचे पाणी केसांच्या वाढीसोबत उत्कृष्ट कंडिशनर म्हणून काम करतं. 


मेथी आणि तांदळाचं पाणी कसं बनवायचं?


मेथी आणि तांदळाचं पाणी बनवण्यासाठी एका भांड्यात 3-4 ग्लास पाणी टाकून गॅसवर गरम करायला ठेवा. नंतर या 2-3 चमचे मेथीदाणे आणि 3-4  चमचे तांदूळघालून ते चांगल उकळू द्या. 
अधिक फायदा मिळविण्यासाठी मेथी आणि तांदूळ तुम्ही रात्रभर भिजत ठेवू शकता. पाण्याला चांगली उकळी आल्यावर ते पाणी थंड करुन घ्या. आता हे पाणी गाळून घ्या.तुमची मेथी आणि तांदळाचे पाणी केसांना लावण्यासाठी तयार आहे.


महत्त्वाचं मेथी आणि तांदूळ न फेकता तुम्ही त्याची पेस्ट करुन केसांना हेअर मास्क म्हणून लावू शकता. 


कसे लाववे हे पाणी ?


मेथी आणि तांदळाचे पाणी तुम्ही केसांसाठी अनेक प्रकारे वापरू शकता.केस धुण्यासाठी वापरू शकता आणि काही काळ केसांमध्ये लावू ठेवून नंतर केस धुवू शकता. केस धुण्यापूर्वी हे पाणी 4 तास आधी लावून ठेवावे. तुम्ही अगदी रात्रभरदेखील केसांमध्ये लावू शकता. हा उपाय आठवड्यातून 2-3 वेळा केल्यास तुम्हाला फायदा होईल. 


अळशी आणि तांदूळ पेस्ट 


अळशी (Flaxseeds)आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. अळशीमध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतं. ते केसांच्या आरोग्यासाठी चांगल असतं. 



घरच्या घरी Keratin treatment


Keratin treatment करण्यासाठी पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च होतात. पण आज आम्ही तुम्हा घरच्या घरी नैसर्गिकरित्या Keratin treatment कशी करु शकता हे सांगणार आहोत. 




या साठी 5-6 छोटे ओल्या खोबराचे तुकडे, 1/4 cup भात, 1/4 cup दही आता मिक्सरमधून चांगली पेस्ट बनवून घ्या. या पेस्टमध्ये 1tsp Olive Oil मिक्स करा.  


(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)