तेलकट त्वचेला खुलवण्यासाठी असा करा `मधा`चा वापर !
आजकालच्या तणावग्रस्त होत असलेल्या जीवनशैलीमुळे आरोग्यासोबतच सौंदर्यही खराब होत आहे.
मुंबई : आजकालच्या तणावग्रस्त होत असलेल्या जीवनशैलीमुळे आरोग्यासोबतच सौंदर्यही खराब होत आहे. प्रामुख्याने तेलकट आणि संवेदनशील त्वचेच्या लोकांना विशेष काळजी घ्यावी लागते. ऋतूमानानुसार होणार्या बदलाप्रमाणे त्यांच्या ब्युटी रूटीनमध्येही बदल करणं आवश्यक आहे. चेहरा खुलवण्यासाठी मध अत्यंत फायदेशीर आहे. मधामुळे चेहरा नैसर्गिकरित्या खुलण्यास मदत होते.
त्वचा मुलायम होते -
चमचाभर लिंबाच्या रसामध्ये मध मिसळा. ही पेस्ट चेहर्यावर लावा. 20 मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. आठवड्यातून एकदा या पेस्टचा वापर केल्यास हळूहळू त्रास कमी होण्यास मदत होते.
त्वचेला उजाळा -
शुष्क त्वचा पुन्हा तजेलदार करण्यासाठी चमचाभर दूध पावडर, चमचाभर अॅप्पल सायडर व्हिनेगर आणि मध मिसळून त्वचेवर 10 मिनिटं लावावे.
या पेस्टचा वापर त्वचेवरही परिणामकारक आहे. आठवड्याभरात त्वचा तजेलदार होण्यासाठी मदत होते.
तेलकट त्वचेसाठी
दोन चमचे ऑलिव्ह ऑलिव्हमध्ये एक लहान चमचा मध मिसळा. 5 मिनिटं हे मिश्रण चेहर्यावर लावा. थोड्यावेळाने चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवाव. त्यानंतर मॉईश्चरायझर क्रीम लावावे. आठवड्यात नियमित दोन वेळेस हा उपाय केल्याने तेलकट त्वचा खुलण्यास मदत होते.
चमकदार त्वचा -
टोमॅटोच्या रसासोबत अर्धा चमचा मध मिसळा. ही पेट चेहर्यावर लावा. 15 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवावा. यामुळे त्वचा चमकदारहोण्यास मदत होते.