मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसात पचनाशी निगडीत अनेक आजार वाढतात. यामध्ये उष्माघात, पित्त याप्रमाणेच डायरिया (जुलाब) चा त्रासही वाढतो. वेळीच जुलाबाच्या समस्येवर उपचार न घेतल्यास हा त्रास गंभीर ठरू शकतो. आठवड्याभरात डायरियाचा त्रास आटोक्यात न आल्यास शरीरात पाण्याची पातळी कमी झाल्याने रूग्ण बेशुद्ध होऊ शकतो. 


उन्हाळ्यात काळजी घ्या 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उन्हाळ्याच्या दिवसात वातावरणात उष्णता अधिक असल्याने नैसर्गिकरित्या डिहायड्रेशनचा त्रास बळावू शकतो. अशावेळेस उलटी किंवा जुलाबाचा त्रास होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. काही घरगुती उपचारांच्या मदतीने डायरियाचा त्रास आटोक्यात ठेवता येऊ शकतो. याकरिता डाळिंब फायदेशीर ठरते. 


डाळिंब फायदेशीर 


पोटाचे आरोग्य जपण्यासाठी, जुलाबाचा त्रास कमी करण्यासाठी डाळिंब फायदेशीर ठरते. डाळिंबाच्या सेवनामुळे डायरिया आटोक्यात ठेवण्यास मदत होते.   
 
डाळिंबामध्ये अ‍ॅन्टी इन्फ्लामेंटरी गुणधर्म असतात. सोबतच पॉइफेनॉल, एलागिटॅनिन आणि एंथोकाईनिन गुणधर्म असतात. यामुळे जुलाबाचा त्रास आटोक्यात राहतो. 


डाळिंबाची साल फेकून देण्याऐवजी त्याचा रस डायरियाचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत करते. 


डाळिंबाची साल, फूलं आणि बीजं आरोग्याला फायदेशीर आहेत. 


डाळिंबाचे दाणे थेट खाल्ल्यास किंवा त्याचा रस प्यायल्यास आरोग्याला फायदेशीर ठरते.