मुंबई : बऱ्याच लोकांना कामामुळे पहाटे लवकर उठावे लागते. पण बऱ्याच लोकांना पहाटे उठणं आवडंत नाही. सकाळी उठल्यावर आपले जीवन खूप सोपे होते. यामुळे वेळेचे योग्य व्यवस्थापन देखील होते. तसेच निरोग्य आयुष्य आणि चांगल्या जीवनशैलीसाठी सकाळी लवकरण उठणे केव्हाही चांगलेच आहे. म्हणून तर डॉक्टर देखील आपल्याला सकाळी लवकर उठण्याचा सल्ला देतात आणि व्यायाम, योगा किंवा ध्यान करण्याचे सल्ले देतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे, जर आपण उशिरा उठलो, तर आपल्याला आरोग्यावर याचा परिणाम होतो. शिवाय आपल्या कामावर देखील याचा परिणाम होतो. त्यामुळे नेहमी सकाळी लवकर उठा. आता तुम्ही म्हणाल की, कितीही प्रयत्न केला तरी सकाळी लवकर उठता येत नाही, तर अशा लोकांसाठी काही मार्ग घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुम्ही सकाळी लवकर उठू शकाल. चला याबद्दल जाणून घेऊ या.


अलार्म असलेलं फोन किंव घड्या दूर ठेवा


बहुतेक लोकांची सर्वात मोठी समस्या ही, असते की दररोज सकाळी जेव्हा अलार्म वाजतो, तेव्हा ते फक्त आपल्या डोक्याजवळील फोन किंवा घड्याळ घेऊन त्याला बंद करतात आणि पुन्हा झोपी जातात. हे टाळण्यासाठी तुम्ही तुमचे घड्याळ किंवा फोन नेहमी बेडपासून दूर ठेवा.


जर तुम्ही असे केले तर तुम्हाला अलार्म बंद करण्यासाठी बेडवरून खाली उतरावे लागेल, ज्यामुळे तुमची झोप उडायला मदत होईल.


बेडरूममधून बाहेर पडा


अलार्म बंद करताच लगेच खोली सोडा आणि मोकळ्या जागी उभे राहा. असे केल्याने तुमच्या शरीराला ताजी हवा मिळेल आणि तुमच्या डोळ्यांवरी झोप निघून जाईल.


मोबाईलपासून अंतर ठेवा


रात्री झोपण्यापूर्वी एक तास फोन, लॅपटॉप किंवा टीव्ही अजिबात पाहू नका. फोन किंवा लॅपटॉपमुळे झोपेचे चक्र बिघडते. त्यामुळे असं होऊ देऊ नका. ज्यामुळे तुम्ही रात्री लवकर झोपाल आणि तुम्हाला सकाळी लवकर उठण्यासाठी मदत होईल.