HPV Vaccine: हल्लीच पूनम पांडेने Cervical Cancer मुळे मृत्यू झाला अशी पोस्ट करत खळबळ उडवली. या पोस्टनंतर नेटीझन्सकडून तिच्यावर टीकेची झोड उठली. खुद्द पूनमने आपण जनजागृ्ती करण्यासाठी अशी पोस्ट केले असे म्हणत HPV बद्दल लोकांना जागरुक केले. पण पूनम पाडेंच्या या पोस्टआधीच म्हणजेच 1 फ्रेबुवारी 2024 ला बजेट सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एक मोठी घोषणा केलीय. भारत सरकार येत्या काही दिवसात राष्ट्रीय टिकाकरण अभियानाअंतर्गत 9 ते 14 वयोगटातील मुलींना एचपीव्ही लसीकरण सुरु करणार आहे. आता एचपीव्ही म्हणजे काय? यासाठी कुठे लस मिळेल? एचपीव्हीचा प्रसार कसा होतो? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधूया..


एचपीव्ही म्हणजे काय?  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोप्या भाषेत एचपीव्ही हा एक विषाणू आहे म्हणजेच Human papillomavirus. साधारण 200 विषाणूच्या समूहाला HPV असे नाव देण्यात आले आहे. 


एचपीव्ही संसर्ग कसा होते?


एचपीव्हीचा संसर्ग शाररिक संबंधातून होतो. तुमचा जोडीदार एचपीव्ही संक्रमित असेल तर त्याची लागण तुम्हालाही होण्याची शक्यता असते. 


एचपीव्ही संसर्गाची लक्षणे काय? 


एचपीव्ही संसर्गाने संक्रमित असलेल्या अनेकांना हे माहित नसते की त्यांना संसर्ग झाला आहे. कारण अनेकदा त्याची लक्षणे दिसत नाही, किंवा आरोग्य समस्या निर्माण होत नाहीत. काही लोकांना जननेंद्रियाच्या नजीक त्याना चामखीळ आल्यावर त्यांना HPV असल्याचे आढळते. 


एचपीव्ही संसर्गाचा धोका काय? 


एचपीव्ही संसर्गातून पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही धोका आहे. काही प्रकारच्या एचपीव्ही संसर्गामुळे कर्करोग होत नाही. परंतु काही प्रकारच्या जननेंद्रियाच्या HPV मुळे गर्भाशयाच्या खालच्या भागाचा कर्करोग म्हणजेच Cervical Cancer होऊ शकतो. यासह गुद्द्वार, पुरुषाचे जननेंद्रिय, स्त्रियाचा योनीभाग, आणि घशाच्या मागील भागाच्या कर्करोगासह इतर प्रकारचे कर्करोग एचपीव्हीच्या संसर्गमुळे होतात. 


एचपीव्ही संसर्गचा स्त्रियांना अधिक धोका? 


होय, पुरुषांच्या तुलनेत एचपीव्ही संसर्गाचा स्त्रियांना अधिक धोका आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रम (ICMR-NCRP) अंतर्गत, 2023 मध्ये देशात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या रुग्णांची अंदाजे 3 लाखांपेक्षा जास्त संख्या होती, अशी माहिती सरकारने संसदेत दिली आहे.


एचपीव्ही संसर्गचा प्रतिबंध कसा करता येईल?


एचपीव्ही संसर्गला प्रतिबंध करता येईल का तर उत्तर होय आहे. एचपीव्हीवर HPV Vaccine निघाली आहे. ही एचपीव्ही लस जननेंद्रियाची चामखीळ ते गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगपर्यत एचपीव्हीने होणाऱ्या संसर्गापासून संरक्षण करते.


एचपीव्ही लस कोणत्या वयात घेता येईल?


साधारण 9 वर्षापासून ते 14 वयोगटापर्यंत एचपीव्हीची लस देण्यात येते. पण 9 ते 45 वयोगटातील पुरुष आणि स्त्रिया ही लस घेऊ शकतात.


एचपीव्ही लस भारतात उपलब्ध आहे का? 


Serum Institue of India ने 2022 मध्ये Cervavac Vaccine लस बाजारात आणली. भारताने स्वदेशी विकसित केलेली पहिली HPV लस म्हणून या लसीला मंजूर दिली आहे.  यासह Gardasil 9 ही लस सुद्धा बाजारात उपलब्ध आहे. लवकरच केंद्र सरकार राष्ट्रीय टीकाकरण मोहिमे अंतर्गत एचपीव्ही लसीकरणाला प्रायोगिक तत्वावर सुरु करणार आहे. ही लस 9 ते 14 वयोगटातील मुलींना सरकारमार्फत मोफत देण्यात येईल 


एचपीव्ही लसीची किंमत काय? 


साधारण भारतात 2000 ते 4000 या किंमत दरात लस उपलब्ध आहे. तसेच नव्याने आलेली Gardasil 9 ही लस बाजारात 10 हजार 850 रुपये या दरात उपलब्ध आहे.