मुंबई : मुहूर्तावरच बाळ व्हावं, यासाठी सिझेरियन प्रसूतींमध्ये (cesarean delivery) प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातील (National Family Health Survey) धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. तर नफेखोरीमुळे डॉक्टरांचीही सिझेरियनला पसंती देण्यात येत आहे. याचा परिमाण हा  बाळ आणि आईवर होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुहुर्तावर बाळाला जन्म घालण्याचा हट्टामुळे सिझेरिअन करण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाल्याचे एका सर्व्हेक्षणातून पुढं आले आहे. याच मुहुर्तावर जन्म घालण्याच्या आग्रहामुळे सिझेरियनच्या माध्यमातून डॉक्टरांच्या नफेखोरीतही वाढ झाल्याचं दिसून आले आहे. विशिष्ट दिवशीच बाळ जन्माला यायला हवं, हा लोकांचा अट्टाहास एवढा वाढलाय की त्यामुळे मुंबईत सिझेरियनचं प्रमाण प्रचंड वाढलंय. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  


विशिष्ट मुहूर्तावरच बाळ जन्माला यायला हवं असा आई-वडलांचा हट्ट असल्याचं सर्व्बेक्षणातून पुढं आलंय. तसंच प्रसुतीच्या वेदनांचीही महिलांना भीती वाटते. याचाच फायदा उचलत खासगी हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांकडून नफेखोरी वाढत चालल्याचंही निरीक्षण या सर्व्हेक्षणात नोंदवण्यात आलंय. त्यामुळेच सिझेरियनचं प्रमाण वाढले आहे.
 



मुंबईतल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये गेल्या सर्वेक्षणात ११ टक्के असलेलं सिझेरियनचं प्रमाण २५ टक्क्यांवर गेले आहे. तर खासगी रुग्णालयांमध्ये ३० टक्क्यांवरुन ४१ टक्के एवढी सिझेरियन्स वाढली आहेत. हा ट्रेंड काही चांगला नाही. बाळ जेव्हा नैसर्गिकरित्या आईच्या गर्भातून बाहेर येतं, तोच खरा चांगला मुहूर्त असतो. कारण जन्मतःच ते बाळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवून बाहेर येतं, हे लक्षात ठेवा.