माणूस या `5` अवयवांंशिवायही जगू शकतो
प्रत्येकजण आरोग्य जपण्यासाठी विशेष काळजी घेतो. शरीराच्या प्रत्येक अवयवाचे काही विशिष्ट काम असते. त्यामुळे त्याची काळजी घेण्यासाठी विशेष दक्षता घेतली जाते. पण मानवी शरीरात असेही काही अवयव आहेत ज्यांच्याशिवाय आपण जगू शकतो. तुम्हांला ठाऊक आहेत का ? कोणते आहेत हे अवयव ...
मुंबई : प्रत्येकजण आरोग्य जपण्यासाठी विशेष काळजी घेतो. शरीराच्या प्रत्येक अवयवाचे काही विशिष्ट काम असते. त्यामुळे त्याची काळजी घेण्यासाठी विशेष दक्षता घेतली जाते. पण मानवी शरीरात असेही काही अवयव आहेत ज्यांच्याशिवाय आपण जगू शकतो. तुम्हांला ठाऊक आहेत का ? कोणते आहेत हे अवयव ...
डॉक्टरांनी सांगितल्या काही खास गोष्टी -
मानवी शरीर अनेक अवयवांनी बनले आहे. त्यामधील प्रत्येक अवयवाचे काही खास काम असते. परंतू डॉक्टरांच्या माहितीनुसार, काही अवयव शरीरातून काढून टाकले तरीही माणूस नियमित आयुष्य जगू शकतो.
फुफ्फुस
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माणूस एका फुफ्फुसाच्या सहाय्याने जगू शकतो. यादरम्यान थोडा त्रास होऊ शकतो परंतू जगण्यासाठी एक फुफ्फुस पुरेसे ठरू शकते. सामान्य माणसाच्या शरीरात दोन फुफ्फुस असतात. अनेकदा काही आजार असल्यास त्यामधील एक काढण्याचा निर्णय घ्यावा लागतो.
टॉन्सिल्स
गळ्यामध्ये टॉन्सिल्स हा एक अवयव असतो. तोंडामध्ये काही इंफेक्शन झाल्यास, गंभीर आजार असल्यास टॉन्सिल्स काढण्याचा निर्णय घ्यावा लागतो. याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होत नाही.
ओव्हरी
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ओव्हरीजशिवायदेखील आपण जीवंत राहू शकतो. काही वेळेस ऑपरेशनदरम्यान अशी काही स्थिती निर्माण होते की ओव्हरी काढण्याचा निर्णय घ्यावा लागतो. पण यानंतरही सामान्य जीवन जगणं शक्य आहे.
कानाची पाळी
कानाच्या पाळीशिवाय आपण जीवंत राहू शकतो. कानाच्या पाळीचा शरीराला फार काही थेट फायदा नसतो. यामुळे कानाच्या पाळीशिवाय जगणं सुसह्य आहे.
पिट्युटरी ग्लॅन्ड
पिट्युटरी ग्लॅन्ड शिवायदेखील जगणं शक्य आहे. शरीराचे कार्य नियंत्रित करण्याचे काम पिट्युटरी ग्लॅन्ड करतात. मात्र त्याच्याशिवाय माणूस जीवंत राहू शकतो. पिट्युटरी ग्लॅन्डमध्ये इंफेक्शन झाल्यास त्याला काढण्याचा निर्णय घ्यावा लागतो.