दररोज पॅकबंद फळांचे ज्युस पित असाल तर सावधान! शरीराला याच्या फायद्यापेक्षा नुकसानच जास्त
व्यस्त जीवनशैलीमुळे किंवा आळशीपणामुळे ताज्या फळांचे रस पिण्याऐवजी लोक पॅकेट ज्युस जास्त पितात.
मुंबई : आजच्या काळात रेडी टू इट पदार्थ खाण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. यामुळे बनवण्याची मेहनत वाचते, तसेच गोष्टी लगेच उपलब्ध होतात. यामुळे बरेचसे लोक या पद्धतींचा वापर जास्त प्रमाणात करतात. अगदी सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत लोक असे तयार पदार्थ खातात. बाजारात अनेक प्रकारचे पॅकेज केलेले फळांचे रस देखील उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत लोक चांगल्या आरोग्यासाठी फळांचे रस सेवन करतात.
व्यस्त जीवनशैलीमुळे किंवा आळशीपणामुळे ताज्या फळांचे रस पिण्याऐवजी लोक पॅकेट ज्युस जास्त पितात. पण तुम्हाला माहित आहे का की पॅकबंद फळांचा रस सेवन केल्याने तुमच्या आरोग्याला गंभीर नुकसान होऊ शकते?
अशा स्थितीत पॅकेज केलेला फळांचा रस पिण्याचे काय तोटे काय आहेत? हे जाणून घ्या आणि आजपासूनच त्याचे सेवन करणं सोडा
मुलांसाठी हानिकारक
पॅक केलेले ज्यूस टिकवून ठेवण्यासाठी आणि तो जास्त काळ खराब होऊ नये म्हणून त्यात अनेक प्रकारची रसायने मिसळली जातात. त्यामुळे त्याचे सेवन लहान मुलांसाठी खूप हानिकारक असू शकते.
जर तुम्ही मुलाला पॅकेज केलेले फळांचे रस सतत प्यायला देत असाल, तर त्याऐवजी फळे द्या. अन्यथा, तुमच्या मुलांना अन्नाची ऍलर्जी, त्वचेची ऍलर्जी यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
पोटाशी संबंधित आजार
पॅकेज केलेला फळांचा रस प्यायल्याने तुम्हाला अतिसार, बद्धकोष्ठता आणि पचनाशी संबंधित इतर अनेक आजारांचा धोका असतो.
मेंदूच्या समस्यांचा धोका
बाजारात उपलब्ध असलेल्या जवळपास सर्व पॅकेज केलेल्या फळांच्या रसांमध्ये ऑरगॅनिक्स, कॅडमियम आणि पारा यांसारखी रसायने मिसळली जातात. याच्या सेवनाने मुलांच्या मेंदूवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे पॅकेज केलेले फळांचे रस पिणे टाळावे.
लठ्ठपणाच्या समस्येचे बळी
पाकीट फळांचा रस सतत दीर्घकाळ सेवन केल्याने तुम्हाला लठ्ठपणाचा धोका असतो. त्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे तुमचे वजन वाढू शकते.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)