मुंबई : फीट राहणं खूप गरजेचं आहे. मात्र यासाठी अनेकजण जीमचा पर्याय निवडतात. मात्र काहींकडे जिममध्ये जाण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. त्यामुळे अशावेळी अनेकजण ट्रेनरशिवाय घरी व्यायाम करतात. कदाचित तुम्हीही असं करत असाल. मात्र तुम्हाला कल्पना आहे का, तुम्ही असं करत असताना तुमच्याकडून काही चुका होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नियमित वर्कआउट किंवा व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर वॉर्मअप करणं खूप महत्वाचं आहे. जेणेकरून शरीराचं कोणतंही नुकसान होणार नाही. जाणून घेऊया अशा स्थितीत कोणत्या चुका करणं टाळावं.


हेवी एक्सरसाईजने सुरुवात


पहिल्यांदाच ट्रेनरच्या मदतीशिवाय घरी व्यायाम करताना लोक अनेक चुका करतात. ट्रेनरच्या मदतीशिवाय वर्कआउट करत असताना, लोक पहिल्यांदा खूप भारी वर्कआउट्सने सुरुवात करतात. सुरुवातीला हलका व्यायाम करावा. या काळात तुम्ही वेट लिफ्टिंग किंवा इतर कोणताही व्यायाम करू नये.


कूलडाउन रूटीन


काही लोक वर्कआऊट केल्यानंतर कूल-डाउन व्यायाम करतात. कूल डाउन व्यायाम नियमितपणे केला पाहिजे. याचा सराव वगळल्याने तुमच्या स्नायूंना नुकसान होण्याची शक्यता आहे. जेव्हा तुम्ही वर्कआउटनंतर कूल डाउन व्यायामाचा नियमित केला नाही तर तुम्हाला श्वास घेण्यामध्ये काही प्रमाणात त्रास जाणवू शकतो.


योग्य ब्रेक न घेणं


बरेचदा लोक ट्रेनरशिवाय घरी वर्कआउट करताना ब्रेक घेत नाहीत. मात्र तुम्हाला माहितीये का, असं करणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जर तुम्ही दररोज 1 तास वर्कआउट किंवा व्यायाम करत असाल तर या काळात तुम्ही समान अंतराने 5-5 मिनिटांचे 3 ब्रेक घेतले पाहिजेत. 1 तासाच्या वर्कआउट रूटीनमध्ये 15-मिनिटांचा ब्रेक घेणं आवश्यक आहे.