विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : तुम्ही जर दिवसांतून तीन वेळा दात स्वच्छ केले तर तुम्हाला हार्टअटॅक येण्याचा धोका कमी होतो. विश्वास बसत नाहीना...पण हे वास्तव संशोधनातून समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साऊथ कोरीयामध्ये केलेल्या एका रिसर्चमधून ही माहिती पुढे आली आहे. तीन वेळा दात स्वच्छ केल्यास ह्रद्यविकाराचा झटका येण्याचं प्रमाण १२ टक्क्यांनी कमी होतं. त्याशिवाय आर्टीफिशियल फिब्रिलेशनची शक्यताही १०० टक्क्यांनी कमी होते. तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घेतली नाही, तर तोंडात तयार होणारे बॅक्टेरिया ह्रदयासंबंधीचे आजार  होण्यास कारणीभूत ठरतात.


युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेनटीव्ह कार्डीओलॉजी प्रकाशीत रिसर्चमध्ये हे पुढे आलं आहे. कोरीयन नॅशनल हेल्थ इन्शुरन्सद्वारे १६ लाख लोकांच्या डेटावर हा अभ्यास करण्यात आला. ४० ते ८० वयोगटातील माणसांच्या सवयींवर लक्ष ठेवून ही माहिती पुढे आली आहे. 


तोंडात तयार होणार बँक्टेरीया दात आणि हिरड्यांच्या मोकळ्या जागेत तयार होतात, आणि हेच हृदयाच्या संपर्कात आल्याने हृदयाचा धोका वाढतो. दातांची निगा राखल्याने एक मोठी समस्या दूर होवू शकते. त्यामुळे यापुढं दात स्वच्छ करण्याचा कंटाळा करु नका नाहीतर याची किंमत ह्रदयाला मोजावी लागू शकते.