मुंबई : पाणीचे महत्त्व काय हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पाणी हा शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. पाणी शरीराला हायड्रेट ठेवते आणि विविध आजारांपासूनही वाचवते. दिवसभरात किमान 8 ग्लास पाणी पिणं आवश्यक असल्याचं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. पण पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती हे देखील आपण जाणून घेतले पाहिजे. अन्यथा दुष्परिणाम देखील होऊ शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. फुफ्फुसांना नुकसान


जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पितात तेव्हा आवश्यक पोषक आणि जीवनसत्त्वे यकृत आणि पचनसंस्थेपर्यंत पोहोचत नाहीत. ज्यामुळे तुमच्या फुफ्फुसाचे आणि हृदयाचे कार्य बिघडते कारण त्यामुळे ऑक्सिजनची पातळी कमी होते.


2. संधिवातचा धोका वाढतो


जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पितात तेव्हा ते मज्जातंतूंना तणावाच्या स्थितीत ठेवते, द्रव संतुलन बिघडते आणि शरीरातील विषारी द्रव्ये आणि अपचन वाढते, अगदी सांध्यामध्ये द्रव साचतो, ज्यामुळे संधिवात होतो आणि हाडे खराब होतात.


3. किडनी समस्या


जेव्हा आपण बसतो तेव्हा आपली किडनी अधिक चांगले फिल्टर करते. अशा स्थितीत उभे राहून पाणी प्यायल्यास न गाळता ते थेट पोटाच्या खालच्या भागात जाते. त्यामुळे पाण्यात असलेली अशुद्धता मूत्राशयात जमा होऊन मूत्रपिंडाचे कार्य बिघडते. त्यामुळे मूत्रमार्गाशी संबंधित आजार होऊ शकतात.


4. अपचन


उभे राहून पाणी प्यायल्याने पचनसंस्थेलाही हानी पोहोचते. कारण जेव्हा आपण उभे राहून पाणी पितो तेव्हा ते अन्ननलिकेतून प्रचंड वेगाने जाते आणि थेट पोटाच्या खालच्या भागात येते. जे हानिकारक आहे. उभं राहून वेगाने पाणी पिल्याने मज्जातंतूंवर ताण येतो, ज्यामुळे द्रव संतुलन बिघडते आणि विष आणि अपचन वाढते.


मग पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?


तज्ज्ञांच्या मते, पाणी पिण्याची योग्य पद्धत म्हणजे बसून पाणी पिणे. खुर्चीवर बसा, पाठ सरळ ठेवा आणि नंतर पाणी प्या. यामुळे मेंदूपर्यंत पोषक घटक पोहोचतात आणि मेंदूची क्रिया सुधारते. एवढेच नाही तर पचनक्रिया सुधारते आणि पोट फुगण्याची समस्या होत नाही.