मुंबई : आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ही सवय असते की, ते जेवल्यानंतर बडीशेप खातात. असे बोलले जाते की, बडीशेप खाल्याने आपली पचनक्रिया चांगली होते. परंतु तुम्हाला हे माहित आहे का, की बडीशेपचे अतीसेवन करणे नुकसानकारक ठरु शकतं. एवढेच काय तर काही गोष्टींसोबत देखील हे खाणं टाळावं. त्यामुळे तुम्हाला याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. म्हणजे पुढे होणाऱ्या नुकसानाला तुम्ही टाळू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बडीशेपमध्ये अनेक गुणधर्म असतात, त्यामुळे ती खाणे फायदेशीर मानले जाते, परंतु काही विशिष्ट परिस्थितीत बडीशेप खाल्ल्याने त्याचा फायदा तर होत नाही, उलट नुकसानच होते.


एका जातीची बडीशेप जास्त प्रमाणात खाल्ल्याने त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे त्वचा खूप संवेदनशील होते.


जर तुम्हाला वारंवार शिंकण्याचा त्रास होत असेल तर बडीशेप खाऊ नका. हे खाल्ल्याने तुमची समस्या वाढू शकते.


स्तनपान करणाऱ्या महिलांनीही बडीशेप खाणे टाळावे. याचा मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. बडीशेप जास्त प्रमाणात खाणे हे मूल आणि आई दोघांसाठीही हानिकारक आहे.


बडीशेप जास्त प्रमाणात खाल्ल्याने ऍलर्जी देखील होऊ शकते. जर तुम्ही कोणतेही औषध नियमित खात असाल तर त्यासोबत बडीशेप खाऊ नका. नाहीतर त्याचा तुमच्या आरोग्यावरती वाईट परिणाम होऊ शकतो.


तसेच बडीशेप जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोटदुखी होऊ शकते. त्यामुळे त्याची देखील तुम्ही काळजी घेणे आवश्यक आहे.