मुंबई :जर तुम्ही खूप वेळ फक्त बसून काम करता. कोणताच ब्रेक घेत नाही तर तुमचं स्वास्थ बिघडण्याची दाट शक्यता आहे. सतत बसून राहण हे तुमच्या शरीरासाठी खूप घातक आहे. यामुळे संशोधनाची अधिक गरज आहे. अमेरिकेतील रियो ग्रांदे वॅलीमध्ये युनिर्व्हसिटी ऑफ टेक्सासच्या लिंडा इयानेसने माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, खूप वेळ बसल्यामुळे वेगवेगळे आजार होतात. याबाबत जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


खूप वेळ बसण्याचे दुष्परिणाम आहे. जगभरात एकूण मृत्यूंपैकी 4 टक्के लोकांचा मृत्यू हा फक्त दिवसातून 3 ते 4 तास बसल्यामुळे होत असल्याचं समोर आलं आहे. सतत बसून राहण, टीव्ही पाहणे, तसेच खूप वेळ कॉम्प्युटरवर काम करणं हे अतिशय घातक आहे. एकाच कामासाठी तुम्ही एकाचवेळी 3 तास बसून काढले तर ते तुमच्या शरीरासाठी घातक आहेत. 


54 देशांमध्ये याचे संशोधन करण्यात आले. जगभरातील 3.8 टक्के लोकांचा मृत्यू हा एकाचवेळी 3 तासाहून अधिक वेळ बसल्यामुळे होतो. याचा अर्थ या सवयीमुळे वर्षातून 4.33 लाख लोकांचा मृत्यू होते.