लंडन : शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी कमी किंवा प्रमाणात जेवण करायचं असल्यास एकट्याने जेवण करा. मित्र, कुटुंबासोबत व्यक्ती अधिक प्रमाणात जेवण करत असल्याचं एका नव्या संशोधनातून समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकत्रित जेवण करताना व्यक्ती अधिक जेवण करतो. तर एकट्याने जेवताना, एकत्र जेवण्यापेक्षा कितीतरी पट व्यक्ती कमी जेवण करतो, असं अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल न्यूट्रीशनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अध्ययनातून समोर आलं आहे.


ब्रिटनमध्ये, बर्मिघम विद्यापिठातील संशोधक हेलेन रुडॉक यांनी सांगितलं की, आम्हाला असे पुरावे सापडले आहेत की, एखादी व्यक्ती एकट्याने खाण्यापेक्षा कुटुंब आणि मित्रांसह अधिक खाते.


गेल्या काही अध्ययनातून असं समोर आलं की, एकट्याने जेवणाऱ्यांच्या तुलनेत, एकत्रित भोजन करणाऱ्यांनी ४८ टक्के अधिक भोजन ग्रहण केले. तर स्थूलतेने ग्रासलेल्या महिलांनी एकत्रित भोजन करणाऱ्यांच्या तुलनेत २९ टक्के अधिक भोजन केले.


मित्र, कुटुंबांसोबत भोजन करताना जेवणाची मात्रा वाढते. तसंच एकत्रितपणे जेवण करणं आनंददायीही असल्याने, व्यक्ती मित्र, कुटुंबासोबत एकत्र जेवताना अधिक भोजन ग्रहन करत असल्याचे काही संशोधकांनी अभ्यासातून सांगितलं आहे.